27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरऊस उत्पादक शेतक-यांनी अफवांवर विश्वास ठेवून नये

ऊस उत्पादक शेतक-यांनी अफवांवर विश्वास ठेवून नये

एकमत ऑनलाईन

वैशालीनगर, निवळी : विलास कारखाना, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, ट्वेन्टीवन शुगर या साखर कारखान्यांची तोडणी वाहतूक यंत्रणा निवळी गावासह कारखाना कार्यक्षेत्रात ऊस तोडणीसाठी कार्यरत आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळपास आणणार असल्­याचे व्यवस्थापनाने कळविले असून ऊस उत्पादक शेतक-यांनी अफवांवर विश्वास ठेवून नये असे आवाहन केले आहे.

चालू गळीत हंगामात उपलब्ध उसाची वाढलेली प्रती हेक्टर उत्पादकता, त्यामुळे अतिरिक्त उसाची उपलब्धता, सध्या वाढलेली उन्हाची तीव्रता ऊस तोडणी मजुरांची कमतरता इत्यादी अडचणी असतानादेखील सदरील अडचणींवर मात करत विलास सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम माजी मंत्री दिलीपराव देशमुख व संस्थापक अमित विलासराव देशमुख यांचे मार्गदर्शनाने, चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे नेतृत्त्वाखाली व संचालक मंडळाच्या अथक प्रयत्नाने यशस्वीपणे सुरू आहे. चालू गळीत हंगामात कारखान्याने दि. ११ मे २०२२ अखेर उच्चांकी साखर उता-याने ६,९३,६३० मे. टन उसाचे गाळप पुर्ण केले आहे. कारखान्याच्या इतिहासातील हे सर्वोच्च ऊस गाळप आहे.

विलास कारखाना, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, ट्वेन्टीवन शुगर या साखर कारखान्यांची तोडणी वाहतूक यंत्रणा निवळी गावासह कारखाना कार्यक्षेत्रात ऊस तोडणीसाठी कार्यरत आहे. कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप होण्याच्या दृष्टीने विलास कारखान्याने अतिरिक्त ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) आणून ऊस तोडणीसाठी कार्यरत ठेवले आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळपास आणणार असल्­याचे व्यवस्थापनाने कळविले असून ऊस उत्पादक शेतक-यांनी अफवांवर विश्वास ठेवून नये असे आवाहन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या