34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूरसात शेतक-यांचा ऊस शॉर्टसर्कीटमुळे जळून खाक

सात शेतक-यांचा ऊस शॉर्टसर्कीटमुळे जळून खाक

एकमत ऑनलाईन

चाकूर: तालुक्यातील मौजे हटकरवाडी येथील सात शेतक-यांचा दहा एकर ऊस जळुन सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. या शेतक-यांच्या शेतातून वीज वितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांच्या तारा जातात. या वीज वाहिन्या च्या तारांचे घर्षण होऊन ऊसाला अचानक आग लागली होती.

ही आग मोठ्या प्रमाणात पसरली, त्यामुळे या हाटकरवाडी गावातील एकमेकां शेजारी असलेल्या जवळपास सात शेतक-यांंच्या शेतातील दहा एकर ऊस जळुन जवळपास सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून,याचा पंचनामा महसूल विभागाच्या वतीने या भागातील तलाठी, वीज वितरण कंपनीचे लाईनमन यांनी केला आहे.

ऊसाला आग लागल्याची माहिती मिळताच तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे यांनी ऊस नुकसानीचा पंचनामा करण्यांचा आदेश दिला होता.त्याच्यां आदेशानुसार महसूल विभाग आणि वीज वितरण कंपनीचे लाईनमन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि पंचनामा केला आहे. या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतक-यांनी केली आहे.

 

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार; तरूणाविरूध्द गुन्हा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या