24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeलातूरशेतक-यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याच्या सुचना

शेतक-यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याच्या सुचना

एकमत ऑनलाईन

औसा : शेतक-यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रमख उपस्थित महावितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंतासह प्रमुख अधिका-यांची आढावा बैठक दि. १२ सप्टेंबर रोजी औसा येथे पार पडली. या बैठकीत समोर आलेल्या शेतक-यांच्या समस्या तातडीने सोडविण्याची सुचना आमदार अभिमन्यू पवार व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महावितरणच्या अधिका-यांना यावेळी दिल्या.

या बैठकीला अधिक्षक अभियंता दिलीप भोळे, मुख्य अभियंता श्रीकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश शिंदे, संतोषअप्पा मुक्ता, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, पंचायत समिती सदस्य दिपक चाबुकस्वार, शेखर चव्हाण, कार्यकारी अभियंता विष्णु ढाकणे, कार्यकारी अभियंता प्रमोद दुधाळे, नगरसेवक गोपाळ धानूरे, समीर डेंग, संजय कुलकर्णी, बाबासाहेब पाटील, धनराज काजळे,गोविंद मुडबे, विकास नरहरे, पप्पू शेख, महावितरण अभियंता, कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत ३० डिसेंबर रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मांडण्यात आलेल्या सुचनेवरुन कोणते कामे पूर्ण झाले व कोणती कामे अद्याप झालेली नाहीत याची माहिती घेतली. यावेळी उपस्थित महावितरण
अधिका-यांनी त्या बैठकीत नागरिकांनी मांडलेल्या समस्या पैकी ६१ कामे पूर्ण केल्याची माहिती या बैठकीत दिली.
या बैठकीत शेतक-यांनी वीज जोडणी लवकर मिळत नाही. रोहित्री लवकर दिले जात नाहीत. आशा तक्रारी केल्या यावेळी संबंधित तक्रारदार शेतक-यांच्या विभागातील महावितरण अभियंता यांना बैठकीत याबाबत जाब विचारुन शेतक-यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याच्या सुचना करीत संबंधित शेतक-यांना मांडलेली अडचण सांगितलेल्या वेळेत महावितरण कंपनीने नाही सोडविल्यास आपणाकडे याची माहिती द्यावे असे आमदार अभिमन्यू पवार व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

याचबरोबर संबधित विभागातील रोहित्री जळाल्यानंतर मुद्दतीत नाही मिळाली नाही तर महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांनी संबधित अभियंत्यांवर कारवाई करावी. महावितरण कंपनीच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे काम करावे. ज्यांनी करुन शेतक-यांच्या अडचणी तातडीने सोडविण्यास मदत मिळेल.
महावितरण कडून विविध योजना बाबत प्रस्ताव द्यावे. लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही तो निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करु असे यावेळी आमदार पवार व खासदार राजेनिंबाळकर यांनी या बैठकीच्या माध्यमातून सांगितले.

सहा महिने कोरोना; आता रिया आणि कंगना!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या