पाटोद्याच्या सुनबाई वसीमा शेख झाल्या उपजिल्हाधिकारी

850

जळकोट : जळकोट तालुक्यातील पाटोदा (बु.) येथील सुनबाई वसीमा शेख (मुल्ला) या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून राज्यात तिसºया आल्या आहेत, त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. त्यांचे माहेर नांदेड
जिह्यात आहे. अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. त्या सध्या नागपूर येथे राज्य कर निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. वसीमा शेख यांचे पती देखील एमपीएससीची तयारी करत आहेत.

वसीमा शेख (मुल्ला) यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंदराव केंद्रे, जळकोट बाजार समितीचे सभापती मन्मथ किडे, नगराध्यक्ष किशनराव धूळशेटे, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके, विलासराव देशमुख युवा मंच जिल्हा उपाध्यक्ष मारुती पांडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते सोमेश्वर सोपा, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बालाजी ताकबीडे, माजी पंचायत समिती सदस्य बाबुराव गुट्टे, माजी सरपंच दयासागर दाडगे, मेहताब मोमीन, भाजपाचे तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे, मनसेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिवशेट्टे, बालाजी उगीले आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Read More  लातूरच्या शासकीय विश्रामगृह प्रवेशद्वारात ऑटोमेटिक सेन्सर सेनीटायझर मशीन कार्यान्वित