28.3 C
Latur
Thursday, March 30, 2023
Homeलातूरपोलीस अधिक्षक मुंडेनी केली सिद्धेश्वर यात्रा परिसराची पाहणी

पोलीस अधिक्षक मुंडेनी केली सिद्धेश्वर यात्रा परिसराची पाहणी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून दि. १८ फेबु्रवारी ते ६ मार्चदरम्यान यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात्रा महोत्सव सुरक्षीत पार पडावा याकरीता पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी यात्रा महोत्सव परिसराची पाहणी करुन कांही विशेष सुचना केल्या. त्याचबरोबर यात्रा महोत्सवकाळात कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी महोत्सव समितीने सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनीही यात्रा महोत्सवाचा आढावा घेतला.

गत दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे विविध निर्बंध लावण्यात आलेले होते. परिणामी लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवही रद्द करण्यात आलेला होता. यावर्षी निर्बंध हटविण्यात आल्यामुळे यात्रा महोत्सव घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधत दि. १८ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान हा महोत्सव विविध कार्यक्रमांनी पार पडणार आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समितीत्यांचे गठण करण्यात आलेले आहे. यात्रा महोत्सव लवकरच सुरु होत असल्याने यात्रा परिसराची सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी पाहणी केली.

यावेळी यात्रा महोत्सव पार पाडणा-या मैदानाचा फेरफटका मारून कोणत्या ठिकाणी कोणते कार्यक्रम होणार आणि कोणतेकोणते स्टॉल उभारण्यात येणार आहेत याची माहिती महोत्सव समितीकडून घेतली. यात्रा महोत्सव निर्विघ्न पार पडावा याकरीता कोणत्या पद्धतीने पोलीस बंदोबस्त लावावा लागेल याबाबतही निरिक्षण केले. यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक जितेंद्र जगदाळे, गांधी चौक पोलीस स्टेशनचे निरीक्षक माकोडे, देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर, आर. पी. चव्हाण, विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले, श्रीनिवास लाहोटी, नरेश पंड्या, सुरेश गोजमगुंडे, विशाल झांबरे आदींची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या