23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरकोरोना झाल्यानंतरच्या दीड महिन्यानंतरच इतर आजारावर शस्त्रक्रिया

कोरोना झाल्यानंतरच्या दीड महिन्यानंतरच इतर आजारावर शस्त्रक्रिया

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोना होऊन गेल्यानंतर इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी, याबाबत संभ्रमच आहे. सध्या आरोग्य विभागाने नॉन कोविडच्या कामांना सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांच्या इतर आजारावरील शस्त्रक्रियाबाबत भुमिका घेतली नाही. त्यामुळे संभ्रम कायम आहे. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी शस्त्रक्रियांसाठी किमान दीड महिना तरी वाट पाहावी, असा सल्ला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी दिला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ९२ हजार २११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ८९ हजार ५९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत २ हजार ४३० रुग्ण मृत्यू पावले आहेत. सद्यस्थितीत ८८ रुग्ण उपचाराधीन आहेत. कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना इतर आजार आहेत. यातील काहींना शस्त्रक्रियेची गरज आहे.

मात्र कोरोना होऊन गेल्यानंतर किमान दीड महिना वाट पाहावी, असा सल्ला डॉ. देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाल्याने नेत्र, कुटूंब कल्याणच्या शस्त्रक्रिया सुरु आहेत. कोरोनामुळे रोग प्रतिकार शक्ती घटते. अशक्तपणा येतो. तो भरुन निघण्यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

अत्यावश्यक, नियोजित शस्त्रक्रिया जिल्ह्यात सुरु आहेत. नॉन कोविड कामांना ब-यापैकी सुरुवात करण्यात आली आहे. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे आणि त्यांना शस्त्रक्रियेची गरज असेल तर त्यांनी किमान दीड महिना थांबावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार उपचार घ्यावेत. नॉन कोविडची कामे ऑक्टोबर महिन्यात यापेक्षा अधिक हाती घेतली जातील. नियोजित आणि इमर्जन्सी शस्त्रक्रिया सुरु आहेत, असे डॉ. देशमुख म्हणाले. नियोजित शस्त्रक्रिया करताना ज्या चाचण्या आवश्यक आहेत त्या केल्या जातात. आता कोरोना चाचणी बंधनकारक आहे. त्यानुसार नियोजित शस्त्रक्रियाही जिल्ह्यात सुरु आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या