32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरलातुरात तापीच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरु

लातुरात तापीच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरु

एकमत ऑनलाईन

लातूर : शहराच्या पश्चिम भागात तुलनेने अधिक रुग्ण आढळून येत आहेत. औसा रोड, बार्शी रोड, अंबाजोगाई रोड या भागातील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत अधिक रुग्ण रुग्णालयात येत असल्याने महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहेत. या भागातील चार प्राथमिक आणि नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसरात ही मोहीम राबविली जात आहे.

कोरोना विषाणुच्या संसर्गाने अचानक उचल खाल्ली आहे. गेल्या आठवड्यातील दैनंदीन अहवालात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ ते ४० च्या आसपास होती. या आठवड्यात ती संख्या दुप्पट म्हणजेच ९० ते ९५ पर्यंत गेली. त्यामुळे सर्वच चिंतेचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद, महानगरपालिका आरोग्य विभाग सतर्क झाले आणि वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाच्या सूचनांनुसार विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

कडक निर्बंध घालण्याचेही नियोजन केले जात आहे. शहराच्या पुर्व, दक्षिण व उत्तर भागाच्या तुलनेत पश्चिम भागात अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने औसा रोड, बार्शी रोड व अंबाजोगाई रोड परिसरात घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांचा सर्वे सुरु केला आहे. सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी आदी लक्षणांचे रुग्ण आहे का, याबाबतची माहिती संकलीत करुन त्यांची चाचणी चाचणी केंद्रांवर केली जात आहे.

या शिवाय सर्दी, खोकला, ताप असलेल्यांनी घराबाहेर पडू नये. कोणाच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहन केले जात आहे. चाचणीचा अहवाल येईपर्यंत घरामध्येदेखील कुटूंबात इतर सदस्यांपासून विलगीकरणात राहावे. कमीत कमी संपर्क ठेवावा. महानरगरपालिकेच्या कोविड चाचणी केंद्रांवर चाचणी करुन घ्यावी, असेही आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

ही आहेत शहरातील चाचणी केंद्र
महानगरपालिकेच्या वतीने समाजकल्याण वसतिगृह मार्केट यार्ड, पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय औसा रोड, पंडित जवाहरलाल नेहरु मनपा रुग्णालय पटेल चौक आणि प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र इंडियानगर या ठिकाणी चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. सर्दी, खोकला, ताप असलेल्यांनी या केंद्रात जाऊन चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

त्रिसूत्रीचा वापर करावा
नागरिकांनी पुढील काही दिवस मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचा अवलंब आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

वीम्यासाठी सहकुटूंब आत्मदहनाचा इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या