26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home लातूर तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

एकमत ऑनलाईन

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील एकूण ७ कोल्हापुरी बंधा-यांचे बॅरेजेसमध्ये रुपांतरण विस्तार व सुधारणा करण्यास जलसंपदा विभागाने तत्वत: मान्यता दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार व राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ), रोजगार हमी, भूकंप व पुनर्वसन, संसदीय कार्य, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या पुढाकाराने या महत्त्वाकांक्षी योजनेस मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे उदगीर व जळकोट तालुक्यातील सुमारे ५०० हेक्टर पेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पाची २.२४ द. ल. घ. मी. इतकी पाणी साठवण क्षमता आहे. या योजनेमुळे जळकोट तालुक्यातील शेतक-यांच्या जीवनात हरीत क्रांती घडून येणार आहे.

या प्रकल्पासाठी लोकनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवगंत विलासराव देशमुख, दिवंगत आमदार चंद्रशेखर भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले होते. त्यांच्या स्वप्नपूर्ती साठी मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी विशेष लक्ष देऊन पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजूर करून घेतला. या प्रकल्पाला जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या मजुंरीमुळे जळकोट तालुक्यातील शेतक-यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वेक्षण व अन्वेषणासाठी ५३.२९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांच्याकडून जलसंपदा विभागाकडे विषयांकित प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्या अनुषंगाने ही मान्यता देण्यात आली आहे.

यासंबंधी जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई येथील अवर सचिव रो. र. पोळ यांनी दि. २६ नोव्हेंबर रोजी आदेश निर्गमित केले असून तालुक्यातील ७ कोल्हापुरी बंधा-याचे बॅरेजेमध्ये रुपांतरण करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षण व अन्वेषण करण्यासाठी कळविण्यात आले आहे.बेळसांगवी येथील कोपबंधा-याचे सर्वेक्षण व अन्वेषणासाठी ७.६२ लाख रुपये, बोरगाव- ८.१३ लाख रुपये, तिरुका- ७.५९ डोंगरगाव क्रमांक १-७.२८ लाख, डोंगरगाव क्रमांक २-७.२८ लाख रुपये, सुल्लाळी-७.३७ लाख रुपये, गव्हाण-७.७१ लाख रुपये याप्रमाणे सर्वेक्षण व अन्वेषणासाठीच्या ५३.५९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. विषयांकित सर्वेक्षण व अन्वेषण करण्याच्या अंदाजपत्रकास सक्षम स्तरावर प्रशासकीय तसेच तांत्रिक मान्यता देऊन निविदा प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सर्वेक्षण व अन्वेषण सुरू करण्यापूर्वी विषयांकीत ७ कोल्हापुरी बंधारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने विधिवत पद्धतीने जिल्हा परिषद, लातूर यांचेकडून हस्तांतरित करुन घेतले आहेत.

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या