22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeलातूरराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महागाई, बेरोजगारीच्या रावणाचे प्रतिकात्मक दहन

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महागाई, बेरोजगारीच्या रावणाचे प्रतिकात्मक दहन

एकमत ऑनलाईन

लातूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढती महागाई व अतिश्य वेगाने वाढणारी बेरोजगारी देशासमोर मोठे संकट निर्माण करणारी आहे. त्याच्या निषेधार्थ लातूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाई, बेरोजगारीच्या रावणाचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. गेल्या आठ वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सातत्याने वाढणारी महागाई, सुशिक्षित तरुणांवर आलेले बेरोजगारीचे संकट, अन्नधान्यावरील जीएसटी, इंधन दरवाढ, विकास कामांमधील भ्रष्टाचार, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण, सातत्याने देशातील विविध भागात सुरू असणा-या धार्मिक तेढ निर्माण करणा-या घटना, शेतकरी बळीराजाच्या आत्महत्या, सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार, केंद्र सरकारची लोकशाही विरोधी धोरणे या सर्व अन्यायकारक व जुलूमकारक गोष्टींमुळे भारतातील जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे शहरातील संविधान चौकात महागाईच्या रावणाचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, प्रदेश सरचिटणीस संजय शेटे, रामभाऊ रायेवार, विशाल विहीरे,आर. झेड. हाश्मी, सोहम गायकवाड, परमेश्वर पवार, डी. उमाकांत, इरफान शेख, बस्वेश्वर रेकुळगे, बाळासाहेब पोटभरे, मयुर जाधव, महेश वाघमारे, विवेक पांडे, बाबा मोमिन, सचिन चव्हाण, अस्लम शेख, उमेश बारकुले, खंडू लोंढे, बालाजी मायराने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या