35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home लातूर लक्षणे दिसतात तात्काळ तपासणी करून घ्यावी-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लक्षणे दिसतात तात्काळ तपासणी करून घ्यावी-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

एकमत ऑनलाईन

नागरिकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत लातूर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे साधला नागरिकांशी संवाद

लातूर: आज पुन्हा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नागरिकांनी ऑनलाईन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले र्दुदैवाने जे मृत्यू होत आहेत त्यामध्ये असे दिसले आहे की लक्षणे असूनही लवकर तपासणी केली नसल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर किंवा आजार अंगावर काढला जातो. अशावेळी डॉक्टरांनाही योग्य उपचार करता येत नसल्यामुळे मृत्यू ओढावत असून नागरिकांनी लक्षणे दिसतात तात्काळ तपासणी करून घ्यावी असे आवाहन लातूर चे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. ते फेसबुक ऑनलाईनद्वारे नागरिकांशी संवाद साधत होते.

उशीरा आलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी कितीही प्रयत्न केला म्हणजे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेऊनही योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसले आहे. यावेळी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले की, मला लोक विचारतात की तुम्हाला कोरोना वगैरे काही नाही का? तर मी असे सांगु इच्छीतो की मी सर्व प्रकारच्या टेस्ट करून घेतल्या असून त्या सर्व निगेटिव्ह आल्या आहेत. सतत लोकांशी संपर्क जास्त प्रमाणात येत असल्यामुळे मी कुटूंबियांपासून दुर राहत असून त्यांची काळजी करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लोक काय म्हणतील या कडे लक्ष देऊ नका

नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करून घेतली पाहिजे. लोक काय म्हणतील या कडे लक्ष देऊ नका. तुम्ही स्वत:ची पर्यायाने कुटूंबियाची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या आरोग्या विषयी जागरूक असले पाहिजे. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघण

ज्या काळात लोकांना किराणा व इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी मुभा दिली जाते त्यावेळी नागरिकांकडून सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघण होत असल्याचे पहायला मिळाले असून, अशी च परिस्थिती राहील्यास लॉकडाऊनमध्ये सूट देऊन काहीच उपयोग होणार नाही.

खासगी रुग्णालयांना केले आवाहन

जिल्हाधिकारी यांनी विशेष विनंती केली की खाजगी रुग्णालयांची जबाबदारी मोठी असून त्यांच्याकडे काही संशयीत रुग्ण आले असल्यास त्यांनी ते तात्काळ शासकिय रुग्णालयाकडे रेफर करणे आवश्यक आहे.

Read More  बीड शहरात ८ स्पॉट कंटेन्मेंट झोन घोषित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या