अहमदपूर : शेतक-यांनी उत्पादकता वाढ व मुख्य साखळी विकास योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. कृषि विभागाकडून राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मुख्य साखळी विकास योजना अंमलबजावणीसाठी चर्चासत्र, पूर्व नियोजन कार्यक्रमाचे तेलगाव येथे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सोयाबीन उत्पादकता वाढ व मुख्य साखळी विकास योजना यावर्षी महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत तेलगाव येथे राबवली जाणार आहे.
यामधून शेतक-यांना बियाण्यांसाठी अनुदान सूक्ष्म मूलद्रव्य्ां, पीक संरक्षण औषधे, बीबीपी यंत्रसाठी अनुदान, ट्रप्स आणि लुअर्ससाठी अनुदान, १०० हेक्टर संत्रासाठी झाडे आदींसाठी शेतकरी बांधवांनी २५ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. शेतक-यांंनी अधिकाधिक ऑनलाइन अर्ज करून लाभ घ्यावा. ही योजना शेतक-याचे उत्पादन वाढविण्यासाठी आहे. शेतक-यांनी कृषि विभागाच्या योजनेत सहभागी होऊन अधिक लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.सोयाबीन पिकाची अष्ट सूत्री सांगून सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी पूर्वमशागत ते काढणीपर्यंत तंत्रज्ञान कृषि सहाय्यक भारती मुरलीधर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास तालुका कृषिअधिकारी भगवान तवर, उपसरपंच पंढरीनाथ जाधव, मंडळ कृषि अधिकारी शरद पवार, कृषि सहाय्यक प्रवीण फड, कृषि पर्यवेक्षक दिगंबर देशमुख, चंद्रशेखर फुलमंटे, प्रगतशील शेतकरी वेंकट पस्तापुरे, लहू पढेकर, ज्ञानोबा पस्तापुरे, शिवाजी खिडसे, कोकरे, बेंबडे , प्रवीण, देवानंद जाधव, सुधाकर बेंबडे, खिडसे गजानन आदी शेतकरी बांधव उपस्थित होते. शेवटी प्रभाकर घुमे यांनी सर्वांचे आभार मानले.