34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरआता तरी मोकाट कुत्र्यांचा करा बंदोबस्त

आता तरी मोकाट कुत्र्यांचा करा बंदोबस्त

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा वाढत असलेला वावर नागरीकांसाठी धोक्याचा ठरत आहे. मोकाट कुत्रे सकाळी व रात्री नागरीकांचा व दुचाक्यांचा पाठलाग करत असल्याने नागरीकामध्ये त्यांची दहशत बसली आहे. या मोकाट कुत्र्यांचा लातूर मनपाने बंदोबस्त करावा म्हणून मनसेने मोकाट कुत्र्यांना झूली घालून आनोख्या प्रकारचे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

लातूर शहरात अनेक भागात व गल्ली बोळात तसेच मेन रोड अशा अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचे कळप ३० ते ५० संखेने दिसून येतात. अशा मार्गाने चालने व जाण्यासाठी नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. लहान बालकांना खेळन्यासाठी जिकरिचे झाले आहे. यात ब-याच बालकांना या कुत्र्यांच्या चाव्या पासून जखमी व्हावे लागले. त्यात कांही जणांना प्राण ही गमवावा लागला. सकाळी व रात्रि फिरायला जाणा-या जेष्ठ नागरिकांना या दबुन बसलेल्या कुत्र्यांच्या कळपाची भीति वाटू लागली. या कुत्र्यांचा कळप आंगावर येईल म्हणून त्यांच्या त्रासापसुन नागरिक हैरान झाले आहेत. कुत्रे कांही वेळा वाहन चालकाचा पाटलाग करतात. त्यापासुन वाचन्यासाठी ते प्रयत्न करत असतांना अपघात होऊन जखमी होण्याचे घटनाही घडत आहेत.

यात विद्यार्थी जास्त बळी पडतात. क्लासला जान्याच्या हेतुने ते वाहन वेगाने चालवितात. त्यात या कुत्र्यांचा पाटलाग अशा सर्व बाबी मनपा प्रशासनास निदर्शनास आणून देवून देखील या गंभीर प्रकारावर दुर्लक्ष करीत आहे. या दुर्लक्षित करणा-या मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अजय कलशेट्टी यांच्या नेतृत्वात नागरिकांनी व बच्चे कंपनिनी कुत्र्यांच्या आंगावर बोलक्या झूली घालून आता तरी करा बंदोबस्त ! हद्दपार करुण दाखव आसे मनपा प्रशासनास आवाहन केले. आता या आवाहनाचा मनपा कसा सामना करते याकडे नागरिककांचे लक्ष लागले आहे.

यावेळी मनसेच्या अनोख्या आंदोलन प्रसंगी अ‍ॅड. अजय कलशेट्टी, मनोज अभंगे, बालाजी पाटील, अंकुश शिंदे, राजाभाऊ शिंदे, गोविंद कांबळे, महाधव रासे, गोपाळ खंडागळे, आकाश घोलप, गणेश गवळी, आकाश ढगे, सुमित भोकरे आदी होते.

उमेदवारांची निवडणूक हिशेब देण्यास टाळाटाळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या