23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरसंसर्ग रोखण्याची काळजी घ्यावी : भुजबळ

संसर्ग रोखण्याची काळजी घ्यावी : भुजबळ

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : तालुक्यासह शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने या कोरोना कोविड -१९ विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.आता शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरवासीयांनी काळजी घ्यावी, असे आवाहन नगरपंचायत मुख्याधिकारी सचीन भुजबळ यांनी केले आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात २५ जुलै ते ३० जुलै पर्यंत जिल्हाधिकारी यांनी कडक लॉकडाऊन’ जाहीर केले आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवांवर बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरवासीयांनी अनावश्यक घराबाहेर न पडता संसर्ग रोखण्याची स्वत:च काळजी घ्यावी.

तालुक्यात या अगोदर कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते परंतु शहर संसर्ग मुक्त असतानाच शहरातील एका ५५ वर्षीय महिलेचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने शहरात ही कोरोना संसर्गाचा शिरकाव झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात संसर्ग वाढू नये यासाठी व्यापाºयाकडून गुरूवारी व शुक्रवारी दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात आला. आता यात शहरात संसर्ग वाढू नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

या कामी नगरपंचायत व पोलिस प्रशासन महत्वाची भूमिका पार पाडत आहे. आता पर्यंत सर्वांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन केले. तसे या पुढील काळात नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. या महामारीला हद्दपार करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याने शहरवासीयांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी सचीन भुजबळ यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने अनावश्यक घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात आले असूनही काहीजण अनावश्यक व विनामास्क फिरत असल्याचे आढळून येत असल्याने अशा लोकांवर नगरपंचायत व पोलीस ठाण्याच्या वतीने दंडात्मक कारवाई सुरुच राहणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

Read More  प्रशासकपदी कोणत्या कार्यकर्त्यांची वर्णी लागणार ?

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या