22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरबाभळगावात स्वीझरलँड टेक्नॉलॉजीने नळ जोडणी

बाभळगावात स्वीझरलँड टेक्नॉलॉजीने नळ जोडणी

एकमत ऑनलाईन

बाभळगाव : प्रतिनिधी
स्वच्छता विभाग जलजीवन मिशन ‘हर घर जल पाणी पुरवठा’ अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वीझरलँड टेक्नॉलॉजी पद्धतीने नळ जोडणीला सुरवात झाली असून यासाठी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेस १ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी गावासाठी मंजूर करुन दिला आहेत. यासाठी ग्रामपंचायतने वेळोवेळी कागदपत्रांचा पुरवठा करुन काम मंजुर झाले आहे.

लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील प्रत्येक कुटुंब, अंगणवाडी, शाळा, दवाखाना अशा पाईपलाईन एच.डी.पी.ई.असून नळजोडणी फेअरवेल वॉल बसून स्वीझरलँड टेकनॉलॉजी पद्धतीने प्रत्येक कुटंबांना समान पाणी वाटप होणार आहे. यासाठी एम.डी.पी.दर्जेदार पाईप वापरून नळाची जोडणी केली जात आहे. जुने नळाचे कनेक्शनला जोडणी मोफत तर नवीन कनेक्शनला ग्रामपंचायतीने आकारलेला कर भरणा करुन कनेक्शन घ्यावे लागणार आहे. सर्व गावात ४ इंच मुख्य पाईपलाईन असून त्या अंतर्गत ३ इंच पाईप लाईनचे काम सुरु असून जागोजागी नळ जोडणीच्या कामाला सुरवात झाली आहे.

यावेळी सरपंच प्रिया मस्के,उपसरपंच गोंिवंद देशमुख, सचिन मस्के, ग्रा.प.सदस्या जयमाला गवळी, ग्रामविकास अधिकारी आनंद मडके, कृषीसाहाय्यक गिरी, प्रगती कन्ट्रकशनचे इंजि.कुंडलिक खटके, ह.भ.प.निवृत्ती महराज थडकर, गुरुंिलंग थडकर आदी उपस्थित होते. राज्याचे माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांनी गावासाठी निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांचे ग्रा.प.च्या वतीने आभारी आहोत, यामुळे गावचा विकासात भर पडली असून कामे दर्जेदार व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, अशी प्रतिक्रिया उपसरपंच गोंिवंद देशमुख यांनी व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या