32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरसुपर स्प्रेडर ठरणारी ठिकाणे टार्गेट

सुपर स्प्रेडर ठरणारी ठिकाणे टार्गेट

एकमत ऑनलाईन

लातूर : सध्या कोरोना विषाणुच्या संसर्गाचा मीटर अतिवेगाने पळत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाािधत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खाजगी कोचिंग क्लासेस, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, अभ्यासिका ही सुपर स्प्रेडर ठरणारी ठिकाणे टार्गेट केली आहेत. या ठिकाणांमध्ये कोविड-१९ सुरक्षा उपाययोजनांचे सक्तीने पालन करण्यात यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले असुन या संस्थांमधील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करुन घेण्याची जबाबदारी त्या त्या संस्थाचालकांची असून येत्या ५ ते ६ दिवसांत ही चाचणी पूर्ण करुन घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमुद केले आहे.

शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि. १३ मार्च २०२० पासून लागु करुन खंड २, ३, ४ मधील तरतूदीनूसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांत कोविड रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले बहुतांश निर्बंध हटविण्यात आले असून विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजनैतिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याच बरोबर वातावरण बदलामुळे नागरीकांमध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आदी कोविड सदृश्य लक्षणे दिसून येत आहेत. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून खाजगी कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था, महाविद्यालये येथे कोविड सुरक्षा उपययोजनांचे सक्तीने पालन करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील खाजगी कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था, अभ्यासिका येथे कोविड सुरक्षा नियमांचे (मास्कचा वापर, एकमेकांच्या दरम्यान चोहबाजूने किमान १.२ मीटर शारिरीक अंतर, सॅनिटायझर व स्वच्छता, थर्मल स्क्रीनिंग, पल्स ऑक्सिमीटरने सॅच्युरेशन तपासणी इत्यादी)सक्तीने पालन करणे व तातडीने सर्व विद्यार्थ्यांचे १०० टक्के कोविड निदान चाचणी (आरटीपीसीआर किंवा रॅपीड अँटीजन टेस्ट) करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी महापालिका आरोग्य विभाग यांनी सर्व संस्थाचालकांशी समन्वय साधून कॅपचे आयोजन करुन पाच दिवसांत सर्व विद्यार्थ्यांची तपासणी होईल, याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी यांनी नमुद केले आहे.

महापालिकेचे स्वतंत्र पथक
लातूर शहरामध्­ये कोविड-१९ रुग्णांच्­या संख्­येमध्­ये वाढ होत आहे. तरी शहरातील विवीध कॉलेज, वसतिगृह व खाजगी कोचिंग क्­लासेस चालकांनी त्­यांच्­या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची कोविड-१९ चाचणी करुण घ्­यावी. यासाठी महानगरपालिकेचे स्­वतंत्र पथक शहर कार्यक्रम व्­यवस्­थापक, डॉ. कलवले रामेश्­वर, लातूर (मो.नं. ९५७९३८९९०५) यांचे नियंत्रणाखाली गठीत करण्­यात येत आहेत. तरी सदरील मोबाईल पथकाकडून किंवा म­हानगरपालिकेच्­या समाज-कल्­याण वस्तिगृह, मार्केट यार्ड, पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, औसा रोड, पंडित जवारलाल नेहरु मनपा रुग्­णालय, पटेल चौक, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, इंडीया नगर या चाचणी केंद्रावर विद्यार्थ्यांना पाठवून कोविड-१९ चाचणी करुन घ्­यावी, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्­या वतीने करण्­यात आले.

शहराच्या पश्चिम भागातील घरोघरी जाऊन तापीच्या रुग्णाचे सर्वेक्षण
राज्­यामधील काही जिल्­ह्यामध्­ये मागील काही दिवसापासुन कोविड-१९ रुग्­णांच्­या संख्­येमध्­ये वाढ होत आहे. लातूर शहरामध्­येदेखील कोविड रुग्णांच्­या संख्­येमध्­ये वाढ होत आहे. प्रामुख्याने शहराच्­या पश्चिम भागामध्­ये तुलनेने आधिक रुग्­ण आढळून येत आहेत. त्यामुळे या भागात महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन तापिच्या रुग्णांचे सर्वेक्षण केले जात आहे.

शहरातील अंबेजोगाई रोड, औसा रोड, बार्शी रोड या भागातील प्राथमिक नागरी आरोग्­य केंद्र, इंडीयानगर, प्राथमिक नागरी आरोग्­य केंद्र, गौतमनगर, प्राथमिक नागरी आरोग्­य केंद्र, प्रकाशनगर व प्राथमिक नागरी आरोग्­य केंद्र, मंठाळेनगर या भागात तुलनेने अधिक रुग्­ण आढळून येत असल्­याने या ४ प्राथमीक नागरी आरोग्­य केंद्राच्­या परिसरामध्­ये महानगरपालिकामार्फत घरोघरी जावुन तापीच्­या रूग्­णांचे सर्वेक्षण करण्­यात येत आहे. तरी सर्वेक्षणासाठी घरी येणा-या आरोग्­य कर्मचा-यांना सहकार्य करावे. ज्­या नागरीकांना सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी इत्­यादी लक्षणे आढळून येत आहेत त्­यांनी मनपाच्­या कोविड-१९ चाचणी केंद्रावर तातडीने चाचणी करुण घ्­यावी. अशा नागरीकांनी कोविड-१९ नसल्याची खात्री झाल्­याशिवाय, कामावर जावु नये. कोविड-१९ चाचणी होईपर्यंत घरामध्­येदेखील कुटूंबातील इतर सदस्यापासुन विलगीकरणात रहावे, कमीत कमी संपर्क ठेवावा.

महानगरपालिकेच्या समाज-कल्­याण वस्तिगृह, मार्केट यार्ड, पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, औसा रोड पंडित जवारलाल नेहरु मनपा रूग्­णालय, पटेल चौक, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, इंडीयानगर याठिकाणी कोविड-१९ चाचणी केंद्र सध्­या सुरु आहेत. तरी पुढील काही दिवस शहरातील नागरीकांची अधिक दक्षता घ्­यावी व मास्­कचा वापर करणे हँडसॅनिटायझरचा वापर करणे व सामाजिक अंतर राखणे या त्रिसुत्रीचा वापर करुन शहरातील वाढत असलेला कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्­या वतीने करण्­यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा चोविस हजाराच्या दारात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या