22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeलातूरप्रशिक्षणाच्या धसक्याने शिक्षक होतायेत बेजार

प्रशिक्षणाच्या धसक्याने शिक्षक होतायेत बेजार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिवाळीहून परत आलेल्या शिक्षकांच्या मागे प्रशिक्षणाचा ससेमिरा लावला आहे. त्यामुळे शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या ऐवजी नुसते प्रशिक्षणच घेण्यात बेजार होत आहेत. अशी परिस्थिती जिल्ह्यात सध्या दिसून येत आहे. कोरोना मध्ये गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा स्तर घसरला आहे. तो भरून काढण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिवाळी नंतर शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या संदर्भाने कार्यशाळा नुकत्याच घेण्यात आल्या.

शिष्यवृत्तीची कार्यशाळा संपते ना संपते तोच स्काऊट गाईडचे प्रशिक्षण झाले. तर सध्या अध्ययन स्तर वाढीसाठी शिक्षकांचे बिट स्तरावर काल व आज असे दोन दिवस प्रशिक्षण होत आहे. हे प्रशिक्षण संपते ना संपते, तोच जिल्ह्यात सध्या ३५१ ग्राम पंचायतींच्या सार्वजनीक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्यासाठीही पुन्हा शिक्षकांना प्रशिक्षणास सामोरे जावे लागणार आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा नुसता धडाका सुरू असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांनी प्रशिक्षणावर प्रशिक्षणाचा धसका घेतला आहे. असे सतत प्रक्षिण घेणारे शिक्षक शाळेत त्या प्रशिक्षणाचा उपयोग केंव्हा करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या शिक्षक, मुख्याध्यापक, प्राथमिक पदविधर, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदे असताना कमी मनुष्यबळात सध्या शाळा सुरू आहेत. त्यातही शिक्षण विभागाने प्रशिक्षणावर प्रशिक्षण लावल्याने शिक्षक प्रशिक्षण घेणार की शाळा सुरू ठेवणार असा प्रश्न शिक्षकांच्या मधून उपस्थित होत आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांना शाळेत शिकवू द्या, असा सुर उमटताना दिसून येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या