26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरशिक्षकांचे धरणे आंदोलन

शिक्षकांचे धरणे आंदोलन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
कुपोषण निर्मुलन निधी, बळीराजा बलीकरण निधी, कोरोना निधी, जिल्हा परिषद जिंदाबाद नाटक निधी या सर्व निधीचा तात्काळ शिक्षक संघटनांना हिशोब द्या. तसेच शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकवू द्या, अशा विविध मागणीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या समोर लातूर जिल्हा परिषद संघटना महासमन्वय समितीच्यावतीने विराट लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. शिक्षकांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला.

लातूर जिल्हा परिषद संघटना महासमन्वय समितीने शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर, रिक्तपदे पदोन्नतीने तात्काळ करावीत. कोव्हीड मध्ये मयत कर्मचारी बांधवांच्या कुटुंबियांना कोरोना निधीचे त्वरीत वितरण करण्यात यावे, शालेय पोषण आहार योजना शासन निर्णयानुसार स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवावी याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांवर लादू नये. शालेय पोषण आहार योजनेचे स्वतंत्र लेखापरीक्षण रद्द करावे. चट्टोपाध्याय व निवड वेतनश्रेणी प्रलंबित त्रुटीचे प्रस्ताव विनाअट तात्काळ निकाली काढावेत. शिक्षण कार्योत्तर परवानगी आदेशातील अट क्र. १ रद्द करुन आदेश निर्गमीत करावे. शिक्षकांच्या रिक्त जागा आंतरजिल्हा बदलीने तात्काळ भराव्यात या प्रकरणी रिक्त जागा असताना चुकीची माहिती देऊन दिरंगाई करणा-या प्रशासकीय अधिका-यावर तात्काळ कारवाई करावी. अंशदायी पेन्शन योजनेतील जमा रक्कमेचा हिशोब देऊन ती सर्व रक्कम राष्ट्रीय निवृत्ती योजना मध्ये वर्ग करावी. सातव्या वेतन आयोगातील सर्व थकित हप्ते जमा करुन अंशदायी पेन्शन योजना धारकांना रोखीने अदा करावी.

गटसाधन केंद्रातील विषयतज्ञ व साधनव्यक्ती यांना जॉबचार्ट प्रमाणे काम करण्याची संधी द्यावी. सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रलंबित देयके, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, पुरवणी देयके, यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करुन द्यावा. शिक्षण कायद्यानुसार मुख्याध्यापक व शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे लादू नये. व्हॉट्सअ‍ॅप वरील प्रशासकीय आदेश व सुचना तात्काळ बंद कराव्यात. शिक्षकांना प्रशासकीय अधिका-याकडून सन्मानाची वागणूक मिळावी. शिक्षकांचे चुकीच्या पध्दतीने केलेले निलंबन तात्काळ रद्द करावे. शाळेचे विद्युत देयक जिल्हा परिषद शेष फंडातून भरावे. कमी विद्यार्थी पटसंख्येच्या व इतर शाळेवरील शिक्षकांचे नियमबा केलेले तात्पुरती व्यवस्था आदेश रद्द करावेत. जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे व आगाऊ वेतनवाढ प्राप्त शिक्षकांचे देयकासाठी आर्थिक निधी उपलब्ध करुन द्यावा. जिल्हा परिषद शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुडचा शिक्षण विभागातील हस्तक्षेप थांबवावा. सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती सेवापुस्तिका पडताळणीचे कॅम्प तालुका स्तरावर करावे. ३५४ रूपये अपघात विम्याची नोंद सेवापुस्तिकेत करावीत. केंद्रप्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त पदभार केंद्रातील सेवाजेष्ठ शिक्षकांस देण्यात यावा, या मागणीसाठी जि. प. समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात लातूर जिल्हा परिषद संघटना महासमन्वय समितीचे केशव गंभीरे, सुनिलकुमार हाके, मच्छिंद्र गुरमे, सुभाष मस्के, अण्णासाहेब नरसिंगे, चंदू घोडके, तानाजी सोमवंशी, हिरालाल पाटील, ज्ञानेश्वर जाधव, बालासाहेब कदम, जे. ते. गायकवाड, मंगेश सुवर्णकार, माधव गीते, सलीम पठाण, उत्तम कठाळे, परमेश्वर बालकुंदे, छायाताई देशपांडे, सटवाजी कांबळे, सुनील बिराजदार, गोविंद कांदे, दिलीप शेटे, बालाजी बिडवे, अनिल हुलगे, अंतेश्वर माळी, भाग्यश्री चव्हाण, विजयकुमार सातपुते, नागनाथ मेकले, बळवंत सरवडे, संगमेश्वर शिवणे, बंकट जाधव, माधव अंकुशे, पांडुरंग येलमटे, रवी भोसले, ओमप्रकाश नागुरे, नागेश लोहारे, राजकुमार भूसनीकर, रमेश गोमारे, प्रभाकर घोडके, अजय रेनापुरे, मच्छिंद्र चाटे, दत्तात्रय रत्नपारखे आदींनी सहभाग नोंदवला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या