लातूर : प्रतिनिधी
शिक्षकांनी आयुष्यात ज्ञाननिष्ठा, विद्यार्थीनिष्ठा आणि समाजनिष्ठा शेवटपर्यंत जपावी आणि विद्यार्थी केंद्रस्थानी ठेऊन अध्यापनाचे कार्य करावे, असे आवाहन डॉ. नागोराव कुंभार यांनी केले. रोटरी क्लब लातूर श्रेयस च्या वतीने वेदप्रतीप्ठान लातूर येथे राष्ट्र शिल्पकार पुरस्कार २०२२-२३ वितरण सोहळा रोटरी क्लब श्रेयसचे अध्यक्ष डॉ. जी. एम. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यासंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ. नागोराव कुंभार बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रांतपाल अॅड. नंदकिशोर लोया उपस्थित होते. प्रकल्प संचालीका शालीनी पाटील आणि चंद्रप्रभा गिरी यांनी आदर्श शिक्षक निवडीसाठीचे निकष सांगुन अत्यंत पारदर्शकपणे निवड केल्याचे सांगितले
यावेळी सिमा कुलकर्णी- श्रीकिशन सोमाणी प्राथमिक विद्यामंदिर, प्रतिभा गुडे महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रं ९, जयश्री अन्नदाते – मातोश्री केशरबाई कडतने उच्च प्राथमिक विद्यामंदिर, जबीन पठाण महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रं. ९, प्रकाश उंबरगेकर – श्री सदानंद माध्यमिक विद्यालय,ह्यांजय राजपुत – महात्मा फुले माध्यमिक विद्यालय अशा एकूण सहा शिक्षक, शिक्षीका यांना ‘राष्ट्र शिल्पकार पुरस्कार २०२२-२३’ डॉ\ नागोराव कुंभार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास डॉ. मायाताई कुलकर्णी, डॉ. सुचित्रा भालचंद्र, डॉ. भास्कर बोरगावकर, डॉ. भास्कर पाटील, सुभद्रा घोरपडे, देवीकुमार पाठक, लातूरमधील सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि क्लबचे सर्व रोटेरीयन्स हजर होते. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन सुनिता देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव संजीवनी कडतने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज मिसाळ, भीम डुणगावे व कलप्पा मानकर यांनी प्रयत्न केले.