22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeलातूरजनसुविधा योजनेतून दहा कोटींचा निधी

जनसुविधा योजनेतून दहा कोटींचा निधी

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यातील शेत, शीवरस्ते व पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पुढकार घेतला असून त्यांनी पाणंद रस्ता योजनेसोबत जनसुविधा योजनेतूही या कामांसाठी दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात या रस्त्यांचे अधिक मजबुत जाळे निर्माण होणार आहे.

जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी दहा वर्षांपूर्वी शेतरस्ते, शीवरस्ते व पाणंदरस्ते अतिक्रमणमुक्त करुन शेतक-यांच्या सहभागातून कच्चे रस्ते तयार केले होते. त्यानंतर नरेगातून या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. हा उपक्रम राजस्व अभियानातून राज्यात राबविण्यात येत आहे. मात्र, मध्यंतरी हा उपक्रम रेंगाळला. २०१८ मध्ये पालकमंत्री पाणंद रस्ता योजना सुरु झाल्यानंतर या उपक्रमाला पुन्हा चालणा मिळाली. पालकमंत्री योजनेतून शेतीला जोडणा-या पाणंद, शिव व गाडीरस्त्यांचे काम करण्यात येते. कच्चा रस्ता तयार करणे, रस्त्याचे मजबुतीकरण करणे व कच्चा रस्ता करुन मजबुतीकरण करणे या तीन प्रकारांत योजनेत काम होतात. आमदार व खासदार निधीसोबत अन्य विविध पंधरा योजनांमधूनही या योजनेला निधी देण्यात येतो.

नरेगातून या रस्त्यांच्या मजबुतीकरणाचे काम सुरु आहे. यासोबत जनसुविधा योजनेतून कच्चा रस्ता करुन मजबुतीकरणाच्या कामासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून लवकरच ३५ रस्त्यांचे काम सुरु होणार आहेत. आमदार निधीच्या शिफारशीनंतर आणखी कामे सुरु होतील. विविध योजनांतून तयार झालेल्या पाणंद, शेतरस्ता व शीवरस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या संकल्पनेतून नरेगातून बिहार पद्धतीने ही वृक्षलागवड होणार असूुन या पद्धतीच्या वृक्षलागवडीत २०० वृक्षांच्या संगोपनासाठी चार कुटूंबांना नरेगातनू तीन वर्षे रोजगार देण्यात येतो.

अतिक्रमणासंदर्भातील सर्व अर्जांवर कार्यवाही करा
राज्य पातळीवरुनही शेतरस्ते, शीवरस्ते व पाणंद रस्त्यांसाठी निधी देण्यात येणार असल्याचे नमुद करुन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रस्त्यांवरील अतिक्रमण मोकळे करण्यासाठी ग्रामपंचायती व शेतक-यांकडून येणा-या सर्व अर्जांवर कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

कच्च्या रस्त्यांसाठी ८ कोटी २० लाखांचा निधी
गत वर्षातील योजनेच्या निधीतून ९० किलोमीटरच्या ७० रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले तर सध्या १३० किलोमीटंरचा ७५ कच्च्या रस्त्यांचे काम सध्या सुरु आहे. विद्यमान आर्थिक वर्षात पालकमंत्री योजनेतील कच्च्या रस्त्यासाठी आठ कोटी २० लाखांचा निधी मिळाला असून त्यातून आतापर्यंत ८५५ किलोमीटर लांबीचे रस्त्या तयार झाले आहेत. त्यावर सहा कोटी ४० लाख रुपये खर्च झाले असून उर्वरीत निधीतून अजून कामे प्रगती पथावर आहेत.

येत्या ४ जुलै रोजी मराठा समाजाचा सोलापुरात उग्र मोर्चा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या