30.8 C
Latur
Friday, March 5, 2021
Home लातूर जळकोट येथे दहा घरांचा परिसर प्रतिबंधित

जळकोट येथे दहा घरांचा परिसर प्रतिबंधित

एकमत ऑनलाईन

जळकोट : मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे, अनेक ग्रामीण भागातील गावांमध्येही या रोगाचा प्रसार झालेला आहे परंतु या पाच महिन्याच्या कालावधीत जळकोट शहरांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नव्हता परंतु जळकोट शहरातील प्रश्न मंदिर परिसरातील एका ५५ वर्षीय महिलेची कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे जळकोट शहरात पहिल्यांदाच कोरणाºया विषाणूने शिरकाव केलेला आहे. त्यामुळे जळकोट शहरात एकच खळबळ उडाली आहे.

कृष्णा मंदिर परिसरातील दहा घरातील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे, पुढील खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग या ठिकाणी सतर्क झालेला आहे. संबंधित महिलेच्या अति संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे, जवळपास दहा ते बारा जणांची टेस्ट केली जाणार आहे.

तसेच जळकोट तालुक्यातील धामणगाव येथे ही एका साठ वर्षे महिलेची कोरोनाची बाधा झाली होती, धामणगाव येथील अति संपर्कातील दहा व्यक्तींचे स्वॅब घेतले जाणार आहेत. तसेच तालुक्यातील घोनसी येथील दोघांचे स्वॅब घेतले जाणार आहेत एकूण जळकोट तालुक्यातील २२ जणांची कोरोना टेस्ट घेतली जाणार आहे. जळकोट येथील परिस्थितीवर तहसीलदार संदीप कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत कापसे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जगदीश सूर्यवंशी ,पोलीस निरीक्षक गणेश सोंडोरे, नगराध्यक्ष किशनराव धूळशेटे, मुख्याधिकारी धनश्री स्वामी, तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी पिनाटे, बागवान, मुंडे तसेच अन्य कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

हळद वाढवणा येथील सहा जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह
जळकोट तालुक्यातील हळद वाढवणा येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, स्वॅब घेण्यापूर्वीच सदरील मृत्यू झाला होता, पुढील कुठलाही धोका नको म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने सदरील मृत व्यक्तीच्या कुटुंबातील नागरिकांचे स्वॅब घेतले होते़ त्याचा अहवाल प्राप्त झाला असून सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

Read More  काटी येथे अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या