23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरदहावी, बारावी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहिर

दहावी, बारावी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहिर

एकमत ऑनलाईन

लातूर : फेब्रुवारी-मार्च २०२० च्या दहावी व बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ न शकलेल्या तसेच ए. टी. के. टी. साठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद,मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येत आहे. त्यानुसार लेखी परीक्षा पूढील कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी ) शुक्रवार दि. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय २० नोव्हेंबर दि. १० डिसेंबर, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी )व्यवसाय अभ्यासक्रम दि. २० नोव्हेंबर ते दि. ७ डिसेंबर इयत्ता १० प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा दि. १८ नोव्हेंबर ते दि. ५ डिसेंबर व इ. १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा दि. १८ नोव्हेंबर ते दि. १० डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेल्या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थाळावर दि. २० ऑक्टोबरपासून उपलब्ध करुन देण्­यात आलेले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेलेच वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुनच परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे.अन्य संकेतस्थळावरीलकिंवा अन्य यंत्रणेने किंवा खाजगी यंत्रणेने छापाई केलेले तसेच व्हॉट्सअ‍ॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्राक ग्राहय धरु नये, असे सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे सचिव डॉ. अशोक भोसले, राज्यमंडळ, पुणे -०४ यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

जिल्ह्यात १४० तर शहरात २५ नवे कोरोनाबाधित

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या