24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरतेरणा, मांजरा तिरी घुमतोय साहेबांचा आवाज

तेरणा, मांजरा तिरी घुमतोय साहेबांचा आवाज

एकमत ऑनलाईन

निलंगा : लक्ष्मण पाटील
तालुक्यातील औराद शहाजानी येथील व्यापारी नंदू विश्वनाथराव भंडारे यांनी गौरी पूजन दिवशी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन केले. भंडारे यांनी गौरी पूजन या सणादिवशी गौरी पूजनासोबतच लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन केले .यामुळे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिल्याने आजही औरादच्या तेरणा व मांजरा तिरी साहेबांचा आवाज घुमत असल्याचे पाहावयास मिळाले .

निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी हे शहर तेरणा व मांजरा नदीच्या मुशीत वाढले आहे. येथील व्यापारी नंदू विश्वनाथराव भंडारे हे लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा एक चाहता आहे . यामुळे त्यांना आधारस्तंभ मानत लक्ष्मीपूजन दिवशी ते आपल्या दुकानात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून लक्ष्मीपूजन करतात शिवाय गौरी पूजना दिवशीही लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. यामुळे आजही औरादच्या तेरणा व मांजरा तिरी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

यावेळी विश्वनाथराव भंडारे, भारतबाई भंडारे , पंढरी भंडारे, प्रताप भंडारे, नंदू भंडारे, राजू भंडारे, शिव भंडारे, हारी भंडारे, उद्धव भंडारे , नारायण भांडारे, ओम भंडारे, वैभव भंडारे, सुनंदा भंडारे, उषा भंडारे, सुमित्रा भंडारे, सुवर्णा भंडारे, यशोदा भंडारे, जानकी भंडारे , श्रद्धा भंडारे उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या