लातूर : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनूसार प्रत्येक व्यक्तीची प्रोटोकॉलनूसार कोरोना चाचणी करावी. अधिकच्या चाचण्या करु नये, असे आदेश राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महसूल, आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण असून संख्येत सतत वाढ होत आहे. कोविड-१९ चाचण्यांसाठी आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
या सूचना तसेच राज्यातील रुग्णांचे स्वरुप लक्षात घेऊन आता नवीन मार्गदर्शक सूचना त्यांनी दिल्या आहेत. चाचण्या आवश्यक असणा-या व्यक्तींची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. उपरासाठी त्वरीत चाचणीची आवश्यकता असलेल्यांची अँटिजेन चाचणी करावी, अँटिजेन चाचणी नकरात्मक आलेले व लक्षणे असणारे रुग्ण, पॉझिटिव्ह व्यक्तींचे हायरिस्क कॉन्टॅक्ट, परदेशातून येणा-या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करावी.
ब्रॉटडेड व्यक्ती, बाळंतपणासाठी आलेल्या माता, अतिगंभीर शस्त्रक्रिया, आदींच्या व्यक्तींच्या ट्रूनॅट चाचणी करावी, ंसे आदेशात म्हटले आहे. मनोरुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांना प्रथम एक आठवडा क्वारंटाईन करावे. त्यानंतर त्यांची अँटिजेन चाचणी करावी, तुरुंगात कैदी दाखल झाल्यानंतर आठवडाभर त्यांना क्वारंटाईन करावे. त्यानंतर त्यांची अँटिजेन चाचणी करावी. चाचणीच्या निष्कर्षानूसार पुढील निर्णय घ्यावा. प्रवास करणा-या, जिल्ह्यात दाखल होणा-या व्यक्ती, व्यापा-यांना लक्षणे नसल्यास चाचणी करु नये, असेही आदेश डॉ. व्यास यांनी दिले आहेत.
ग्रामीण शिक्षणाची जबाबदारी ‘कोविड कॅप्टन’ वर