26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरमराठा समाजाच्या सर्व मागण्यांचा पाठपूरावा करण्याची आमदार अमित देशमुख यांच्याकडून ग्वाही

मराठा समाजाच्या सर्व मागण्यांचा पाठपूरावा करण्याची आमदार अमित देशमुख यांच्याकडून ग्वाही

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
सर्व समाज घटकासाठी सोयीसुवीधा उपलब्ध करुन देणे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. भविष्यातही मराठा समाजाच्या सर्व मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असून त्यासाठी सातत्यांने पाठपूरावा चालूच राहील, अशी ग्वाही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सकल मराठा शिष्टमंडळाशी बोलतांना दिली.
शुक्रवार दि. १५ जूलै रोजी सकाळी सकल मराठा समाज शिष्टमंडळाने माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेतली. लातूर येथे सारथीच्या विभागीय कार्यालयासाठी आवश्यक पदभरतीला मान्यता मिळवून दिल्या बद्दल आणि या संस्थेमार्फत मराठा व कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यासाठी उभारण्यात येणा-या वसतीगृह, ग्रंथालय तसेच इतर सुविधासाठी ४ एकर जागा उपलब्ध करुन दिल्या बद्दल आमदार अमित देशमुख यांचे सकल मराठा शिष्टमंडळाने आभार मानले व सत्कार केला.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथीमार्फत मराठा, कुणबी मराठा या समाजाच्या विद्यार्थ्यासाठी लातूरात ग्रंथालय, अभ्यासीका, कौशल्य विकास केंद्र, सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र ज्येष्ठ नागरीकांसाठी समूपदेशन कक्ष व महिला सशिक्षमीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. हे काम लगेच सुरु होणार असून त्यासाठी लागणारी अतिरीक्त जागाही उपलब्ध करुन दिली जाईल, असे आश्वासनही माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी यावेळी बोलतांना दिले.

याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, आर्वीचे सरपंच धनंजय देशमुख, विलास भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, पुनीत पाटील, हनुमंत पवार, मराठा सेवा संघ लातूरचे जिल्हाध्यक्ष रोहन जाधव, कार्याध्यक्ष ऋ षिकेश कदम, हंसराज जाधव, धनंजय शेळके, प्रमोद कदम, सचिन साळुंके, सचिन दाताळ, डॉ. अभय कदम, विवेक सौताडेकर, प्रा. गणेश बेळंबे, भगवान माकणे, शैलेश भोसले, आशिष कोळगे, अमोल भिसे, सदाशिव थोरात, लातूर जिल्हा काँग्रेसचे सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, व्यंकट शिंदे, प्रतीक जाधव, अजित पवार, करण पवार, निखिल मोरे, भरत भोसले, पृथ्वीराज पवार, आदीसह मराठा सेवा संघ आणि मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या