लातूर : प्रतिनिधी
काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असे एका ८४ वर्षीय आजोबांच्या बाबतीत घडले ते डॉ. रमेश भराटे
यांच्या आरोग्यसेवेतील तत्परतेमुळे. विठ्ठल सिताराम पवार नावाचे रुग्ण अचानक दम लागुन बेशुद्ध पडल्यामुळे त्यांना दि. २० जानेवारी रोजी येथील गायत्री हॉस्पीटल येथे घेवुन आले. डॉ. रमेश भराटे यांनी लागलीच त्यांना अतिदक्षता विभागात घेवुन ऊपचार सुरु केले. पेशंट अत्यवस्थ असल्यामुळे त्वरीत व्हेंटीलेटरवर घेतले. रुग्णाची नाडी व बीपी रेकॉर्ड होत नव्हता त्यामुळे त्यांना अत्यावश््यक जीवन प्रणालीची औषधे सुरु केली.आज जवळ जवळ दहा दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर रुग्ण तंदुरुस्त होवुन घरी परत गेला. रुग्णाला महात्मा ज्योतिबा जीवन दायी योजनेचा लाभ देण्यात आला. रुगणाचे प्राण वाचवल्या बद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. रमेश भरटे यांचे आभार मानले.
योग्य उपचारांमुळे ८४ वर्षीय आजोबांना मिळाले जीवदान
एकमत ऑनलाईन