28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeलातूरप्रखर आत्मबलाने कोरोनावर ९४ वर्षाच्या वृद्धाची मात

प्रखर आत्मबलाने कोरोनावर ९४ वर्षाच्या वृद्धाची मात

एकमत ऑनलाईन

लातूर : जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे लातूर येथील दिगंबर महाजन व सुमन महाजन या वृद्ध दाम्पत्याने कोरोनावर मात केली ती प्रखर आत्मबलानेच. दिनांक १९ एप्रिल रोजी कोविड -१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर रक्तातील विविध चाचण्यांचे आणि एच आर सी टी स्कॅनचे अहवाल, कोविडमुळे शरीरात खूपच संसर्ग झाल्याचे सांगत होते. यामुळे कुटुंबात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. वयाचा विचार आणि घरातील कोणाशीही संपर्क ठेवता न येणे, या दोन मुख्य कारणामुळे या वृद्ध दाम्पत्यांनी गृह विलगीकरणातच रहावे असा कुटुंबातील सर्वांनी निर्णय घेतला.

त्यानंतर वैद्यकीय सल्ला आणि शासकीय औपचारिकता पूर्ण करून लातूर शहर महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या स्थानिक निर्बंधाचे काटेकोर पालन केले गेले. परिणामी कोरोना संसर्ग हळू हळू कमी होत गेला. केवळ १४ दिवसांच्या उपचारानंतर आणि गृह विलगीकरणात राहूनच दिगंबर महाजन, वय वर्ष ९४ आणि त्यांच्या पत्नी सुमन महाजन, वय वर्ष ८४ यांनी या कोरोना विषाणूला शरीरातून हाकलून देण्यात यश मिळविले. मुख्य म्हणजे दिगंबर महाजन यांना जुनाट व दीर्घकालीन दम्याचा आजार असून देखील कोरोनाला पराभूत केले. त्यामुळे कुटुंब चिंतामुक्त होऊन त्यामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

दर दोन तासांनी शरीरातील प्राणवायूची पातळी आणि शरीराचे तापमान यावर या जिगरबाज दाम्पत्याने स्वत: लक्ष ठेवत एकमेकांची काळजी घेतली. दोघांनीही कोणतेही इंजेक्शन घेतले नाही, हे सर्वात महत्त्वाचे. कोरोना संदर्भातील आणि कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक बाबींचा प्रादुर्भाव होऊ न
दिल्यामुळेच आम्ही सहीसलामत बाहेर पडलो, अशी भावना या दाम्पत्यांनी व्यक्त केली.

या जागतिक महामारीत लसीकरणाची मात्रा घेतल्यामुळेच आमची प्रतिकार शक्ती वाढली, तशीच तुमची देखील वाढावी आणि सर्वांना चांगले आरोग्य मिळावे अशी मनोकामना दिगंबर आणि सुमन महाजन या कोरोना योध्यांनी गृह विलागीकरनानंतर कुटुंबातील नातेवाईक आणि नातू व सुना यांनी आयोजित केलेल्या विशेष आभासी वेबिनार मध्ये बोलून दाखविली.

ममतांच्या विरोधात निषेध आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या