30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरऔशातील आडत बाजार पाच दिवस राहणार बंद

औशातील आडत बाजार पाच दिवस राहणार बंद

एकमत ऑनलाईन

औसा : औसा शहर आणि तालुक्यात अनलॉकनंतर कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत असून हा संसर्ग रोखण्यासाठी औसा येथील आडत बाजार बंद करण्यात आला आहे.  औसा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत आडत व्यापारी आणि ग्राहक आरोग्य सेतू अ‍ॅप नियमांचे पालन करण्याची खबरदारी घेऊनही कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होत आहे. शहरासह तालुक्­यात समूह संसर्ग सुरू झाला असून विविध कार्यालयासह, बँका, आडत बाजार बसेस बस वाहतूक व इतर ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत.

परिणामी काळजी घेऊन रोगाचा प्रसार थांबत नसल्याने औसा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन व आडत व्यापारी असोसिएशन यांनी संयुक्तपणे विचारविनिमय करून औशातील आडत बाजार ४ ते ५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी दि. २१ सप्टेंबर पासून औसा आडत व्यापारी वर्गाने शेतक-यांच्या शेतमालाची खरेदी बंद ठेवली आहे.
सध्या शेतकरी वर्गाकडून उडीद – मुंग इत्यादी नवीन शेतमाल आडत व्यापा-यांकडे विक्रीसाठी आणला जात असला तरी आडत व्यापारी यांनी व्यवहार बंद ठेवल्याने शेतक-यांची मात्र थोडीशी गैरसोय होत आहे.

परंतु कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व आडत बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासन व आडत असोशियन यांनी मिळवून घेतलेला निर्णय हा शेतकरी वर्गाच्या सुरक्षिततेसाठीच असून सर्व शेतकरी वर्गांनी ४ ते ५ दिवस आडत बाजार बंद राहणार असल्याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन बाजार समितीचे सचिव मुस्ताक शेख व आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मदनलाल झंवर यांनी केले आहे

कॉम्रेड विठ्ठल मोरे: पुरोगामी डावा विचार निखळला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या