26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home लातूर औशातील आडत बाजार आजपासून सुरु होणार

औशातील आडत बाजार आजपासून सुरु होणार

एकमत ऑनलाईन

औसा : गेल्या १५ जुलैपासून बंद असलेली आडत बाजारपेठ सोमवारी दि १० ऑगस्ट पासून काही नियम व अटीसह सुरु होत असल्याने शेतकरी वर्गाची काही अंशी अडचण दूर होणार आहे. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मुश्ताक शेख यांनी एका पत्रकाद्वारे बाजारपेठ सुरु होत असल्याचे कळविले आहे.

सर्व शेतकरी आडत दुकानदार व खरेदीदार यांच्यासह हमाल व संबंधितांना .िद १० ऑगस्ट २०२० रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती औसा व उपबाजारपेठ किल्लारी येथील दैनंदिन व्यवहार सुरू करण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमावली करण्यात आली आहे .सदर नियमावलीचे सर्वांनी पालन व अंमलबजावणी करावी असे आवाहन केले आहे. यानियमावलीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणीकृत शेतक-यांना व शेतीमालाला प्रवेश दिला जाणार आहे
सर्व शेतक-यांनी आपल्या शेतीमालाची नोंद बाजार समितीच्या अ‍ॅपवर एक दिवस अगोदर किंवा पूर्वी करावी.

सदरील शेतमालाचे व शेतक-यांची नोंद स्वत: अडत व्यापा-यानीही केली तरी चालेल. नोंदणीकृत शेतक-याला बाजार समितीकडून एक दिवस अगोदर एसएमएस’द्वारे शेतमाल घेऊन येण्यासाठी सूचना दिल्या जातील एसएमएस पाठविले शेतक-यांंनाच यार्डमध्ये एसएमएस बघून प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक आडत दुकाने प्रत्येकी पाच शेतक-यांना प्रवेश दिला जाईलकिंवा जास्तीत जास्त शंभर कटे शेतमालाला प्रवेश दिला जाईल.बाजार समितीच्याआवारामध्ये कोणत्याही व्यक्तीला कामाशिवाय प्रवेश दिला जाणार नाही . प्रत्येक आडते व खरेदीदार हमाल बांधवांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असून सौद्यामध्ये सहभाग घेताना आडते खरेदीदार व मुनीम बांधवांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक राहील.

आपल्या दुकानात सँनिटायझर व हाथ धुण्यासाठी साबण उपलब्ध असलेचा पूर्तता अहवाल समितीस सादर करावा. सर्व आडते खरेदीदार व हमाल बांधवांना बाजारामध्ये प्रवेश करताना ओळखपत्र बंधनकारक राहणार आहे. विना मास्क फिरणा-यांना प्रत्येकाला प्रत्येकी दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल. सर्व आडते व खरीदार बांधवांनी आपले व्यवहार वेळेत संपून सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व दुकाने बंद करावीत लवकरात लवकर घरी जावे. तेव्हा सर्व अडते,खरेदीदार, व्यापारी, मुनीम व हमाल बांधवांनी कोरोनापासून होणा-या संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत करावी व बाजार समितीने वेळोवेळी दिलेल्या सूचनांची, नियमावलीची अंमलबजावणी करून बाजार सुरू करण्यास सहकार्य करावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती औसा यांनी केले आहे.

Read More  पाकव्याप्त काश्मीरात रेल्वेमार्ग बांधण्याचा पाकचा डाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या