21.8 C
Latur
Monday, September 21, 2020
Home लातूर जिल्ह्यात १० हजार बेड्सची उपलब्धता प्रशासनाने ठेवावी

जिल्ह्यात १० हजार बेड्सची उपलब्धता प्रशासनाने ठेवावी

एकमत ऑनलाईन

लातूर : कोविड-१९ चा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. पुढील काळात कोविडची परिस्थिती कशी राहील याबाबत कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात किमान दहा हजार बेड्सची उपलब्धता करुन ठेवावी व त्यातील ५० टक्के बेड्स या लातूर शहरांमध्ये उपलब्ध असाव्यात या अनुषंगाने प्रयत्न करावेत, अशी सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विलासराव देशमुख यांनी केली.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोविड-१९ च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठता डॉ. मोहन डोईबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोविडच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांची चाचणी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणखी एक लाख रॅपिड अ‍ॅटीजन टेस्ट किट्स उपलब्ध करुन घ्याव्यात. लातूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर रॅपिड अ‍ॅटिजेन टेस्टिंग कराव्यात, अशा सुचना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिल्या. लातूर शहर व जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेड्स या कोविड रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवाव्यात.

जे खासगी रुग्णालय बेड्स उपलब्ध करुन देणार नाहीत त्या रुग्णालयांना आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण कायद्यातमधील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित करावी, असे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले. तसेच सर्व शासकीय व खासगी रुग्णालयातमधील बेड्स ऑक्सिजनेट करुन घ्यावेत असेही त्यांनी निर्देशित केले.

यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले की, आरोग्य यंत्रणेने कोविड केअर सेंटरमधील व्यक्तींची सिटीस्कॅन व एक्सरे काढून घ्यावा. कारण कोविड टेस्ट करण्यापूर्वी सिटीस्कॅन व एक्स-रे मध्ये अनेक रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे केअर सेंटरमधील व्यक्तींचे तपासणी करुन त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करावेत व मृत्यूदर कमी करण्यासाठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणावर ट्रेंिसग मोहीम राबवावी. तसेच होमक्वॉरंटाईन करण्यात येणा-या व्यक्तीकडून तो घराबाहेर फिरणार नाही हे लेखी स्वरुपात लिहून घ्यावे व त्यानंतर तो घराबाहेर पडल्यास त्यावर कडक कारवाई करावी. कोरोना बाधित रुग्णांस प्रकृती बरी झाल्यावर १० दिवसानंतर रुग्णालयातून सुट्टीत दिल्यानंतरही आरोग्य यंत्रणेने किमान ७ दिवस त्या रुग्णाची दिवसातून दोन वेळा नियमित वैद्यकीय तपासणी केली पाहिजे, असे निर्देश आयुक्त केंद्रेकर यांनी दिले.

लॉकडाऊनचे फायदे हे लॉकडाऊन कालावधीत दिसून येत नाहीत परंतु त्यानंतर या पाच-सहा दिवसात त्याचे परिणाम जाणवतात. प्रशासनाने लाकडाऊन कालावधीत मोठ्या प्रमाणावर कोविड तपासण्या करुन घ्याव्यात. कोविड-१९ चा फैलाव इतरत्र होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश श्री केंद्रेकर यांनी दिले.

पुढील काळात कोरोनाची अधिक गंभीर परिस्थिती उद्भवू शकते या अनुषंगाने प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी करुन ठेवावी. सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील बेड्स ऑक्सिजनची उपलब्धता ठेवावी. जी खाजगी रुग्णालये बेडची उपलब्धता ठेवणार नाहीत त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंध कायदा नुसार कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा पद्धतीने राबविण्यात येत आहेत याची माहिती दिली. तसेच प्रशासनाला पहिल्या टप्प्यात ५ हजार व दुस-या टप्प्यात २५ हजार रॅपिड टेस्ट किट्स उपलब्ध झालेल्या असून त्यानुसार रॅपिड टेंिस्टगची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याची माहिती दिली. तसेच पाच खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णावर उपचार सुरु आहेत. या लॉक डाउन कालावधीत जिल्ह्यात व्यापारी, ट्रेडर्स व व्यावसायिकांचे रॅपिड टेस्टिंग सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यासाठी आणखी एक लाख रॅपिड टेस्ट किट्सची मागणी नोंदवा
पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, लातूर जिल्ह्यासाठी आतापर्यंत जेवढ्या रॅपिड टेस्ट किट्स आलेले आहेत त्याद्वारे नागरिकांच्या कोविड टेस्टिंग करुन घ्याव्यात. तसेच जिल्ह्यासाठी आणखी एक लाख रॅपिड टेस्ट किट्सची मागणी नोंदवावी व त्या उपलब्ध करून घ्याव्यात. या किट्सच्या माध्यमातून लातूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांची तपासणी मोठ्या प्रमाणावर करावी, असे त्यांनी सूचित केले.

Read More  प्रभाग निहाय रॅपिड अ‍ॅटीजन तपासणी केंद्र आणि कोविड केअर सेंटर उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न

ताज्या बातम्या

लातूर जिल्ह्यात ३३० नवे रुग्ण, १२ मृत्यू

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, रविवार दि. २० सप्टेंबर रोजी आणखी ३३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण...

इम्रान खान सरकार ‘नालायक’; अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली : नवाझ शरीफ

इस्लामाबाद - पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार 'नालायक' असून गेल्या दोन वर्षात पाकिस्तानातील अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान नवाझ शरीफ...

पहा व्हिडिओ : बापरे…..वाहून जाणा-या तरुणाला गावक-यांनी वाचवल!

नेवासा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील पुलावरील पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना आज (रविवारी)...

बेरोजगारीचा भस्मासुर!

देशावर मागच्या मार्च महिन्यात कोरोनाचे संकट कोसळले! आता सप्टेंबर महिना अर्धा संपलाय पण अद्याप कोरोनाचे संकट थोडेसेही कमी झालेले नाही. उलट दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच...

कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. उद्योग, सेवा क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला असून जवळपास १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे....

बीड डेपो आगाराची मालवाहतूक करणारी बस जालना जिल्ह्यात नदीत अडकली

जालना : जालना जिल्ह्यात मालवाहतूक करणारी एक एसटी बस नदीत अडकली. ही बस जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बीड...

मनरेगाने दिला गरिबांना आधार

मनरेगा योजनेअंतर्गत कोविडच्या प्रसारकाळात लाखो मजुरांच्या हातांना काम मिळाले आणि त्यांच्या चुली पेटत्या राहिल्या. कामाची हमी देणारी ही योजना गोरगरिबांसाठी उपयुक्त आहेच; शिवाय ती...

ऑक्सिजन वापराचे होणार लेखापरीक्षण

लातूर : सर्वसाधरणपणे पाच ते सहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना प्रत्यक्षात तीन ते चारपटीने रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात येत असल्याने खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन...

आमदार संभाजी पाटील यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

निलंगा : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर य्यांच्या घरासमोर रविवार...

चार दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प

जळकोट : सध्या केंद्र सरकारची बीएसएनएल कंपनी ग्राहकांना दूर लोटण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस बीएसएनएलची ग्राहक संख्या कमी होत असताना, याकडे सरकारचे...

आणखीन बातम्या

लातूर जिल्ह्यात ३३० नवे रुग्ण, १२ मृत्यू

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, रविवार दि. २० सप्टेंबर रोजी आणखी ३३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण...

ऑक्सिजन वापराचे होणार लेखापरीक्षण

लातूर : सर्वसाधरणपणे पाच ते सहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना प्रत्यक्षात तीन ते चारपटीने रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात येत असल्याने खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन...

आमदार संभाजी पाटील यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

निलंगा : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर य्यांच्या घरासमोर रविवार...

चार दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प

जळकोट : सध्या केंद्र सरकारची बीएसएनएल कंपनी ग्राहकांना दूर लोटण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस बीएसएनएलची ग्राहक संख्या कमी होत असताना, याकडे सरकारचे...

सोयाबीन शेतक-यांच्या मुळावर

शिरूर अनंतपाळ (शकील देशमुख) : अनेक अडचणींचा सामना करत पिकविलेल्या सोयाबीनला शेवटी पावसाचा फटका बसल्याने बाधित सोयाबीनच्या पंचनामाच्या प्रतिक्षेतच शेतक-यांनी काढणीला सुरूवात केली आहे....

अतिवृष्टीमुळे पिकांचे पूर्णत: नुकसान

निलंगा : निलंगा, देवणी, शिरुरअनंतपाळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व कांही ठिकाणी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे होऊन शेतक-यांच्या पिकांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब...

औसा शहरासह तालुक्यात पावसाचा कहर

औसा : औसा शहरासह तालुक्यात शनिवार दि. १९ सप्टेंबर मध्यरात्री अतिवृष्टीने कहर केला असून शहरातील जुन्या घरांच्या भिंती पडल्या असून अनेक शेतक-यांच्या शेतातील खरीप...

लातूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या १४ हजारांवर

२८५ नवे रुग्ण, आणखी ११ बाधितांचा मृत्यू, मृतांचा आकडा ४१३ वर लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी...

१९ दिवसांत ६ हजार कोरोनाबाधित रुग्ण

लातूर : लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५९वर पोहोचलेली आहे. मात्र असे असले तरी...

१०३ पथकांच्या माध्यमातून शहरात घरोघर वैद्यकीय सर्वेक्षण

लातूर : राज्य शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत पुढील पंधरा दिवसात १०३ पथकांच्या माध्यमातून घरोघर जाऊन वैद्यकीय सर्वेक्षण केले...
1,254FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...