27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरलेबर कॉलनीतील बाधित क्षेत्र झाले खुले

लेबर कॉलनीतील बाधित क्षेत्र झाले खुले

एकमत ऑनलाईन

लातूर : शहरातील लेबर कॉलनी हा परिसर दि़ ५ जूनपासून खुला करण्यात आला. दि. २२ मे रोजी या भागात कोरोना रुग्ण आढळल्यापासून हा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासून या परिसरात जाण्यास व परिसरातील नागरिकांना बाहेर पडण्यास बंधने घालण्यात आली होती. या कालावधीत महापालिकेच्या वतीने परिसरातील नागरिकांची सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली. अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

लेबर कॉलनी परिसरात दि़ २२ मे रोजी कोरोनाचा रुग्ण आढळला होता. लातूर महापालिका क्षेत्रात आढळलेला हा पहिलाच रुग्ण ठरला. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालिकेने दक्षता घेतली होती. या रुग्णाला बाहेरून प्रवासाचा इतिहास होता. रुग्ण आढळल्यानंतर महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी स्वत: बाधित क्षेत्रात उतरून सर्व यंत्रणा तातडीने कामाला लावली. तातडीने हा परिसर कंटेनमेंट झोन अर्थात बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला. लातूर शहरातील हा पहिलाच कंटेनमेंट झोन ठरला. तातडीने रुग्णावर उपचार सुरू झाले.

Read More  नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधितांमध्ये ७ व्यक्तींची भर

महापालिकेचे अधिकारी व कर्मचाºयांनी तात्काळ या परिसरातील सर्व रस्ते सील केले. या परिसरातील नागरिकांना
बाहेर जाण्यास व बाहेरील नागरिकांना आत येण्यास प्रतिबंध घालण्यात आला. पालिकेच्या कर्मचाºयांनी संपूर्ण परिसर आणि प्रत्येक घराचे निर्जंतुकीकरण केले. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी करून त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंगही करण्यात आले. यामुळे या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिकेला यश आले.

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना या संपूर्ण कालावधीत अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे आव्हानात्मक काम पालिकेच्या अधिकारी व कर्मचाºयांनी यशस्वीरित्या पार पाडले. पालिकेच्या वतीने या परिसरासाठी विशेष पालक अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली होती. साहित्य पुरवठ्यासाठी टीम गठित करण्यात आल्या होत्या. या माध्यमातून नागरिकांना दररोज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कालावधी पूर्ण झाल्यानंतर शुक्रवार, दि. ५ जून रोजी हा बाधित परिसर सर्वांसाठी खुला करण्यात आला. बाधित क्षेत्र शुक्रवारपासून खुले करण्यात आले असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे. आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन महापौर व उपमहापौर यांनी या वेळी नागरिकांशी बोलताना केले.

मनपाने राबविलेल्या उपाययोजनांबाबत नागरिकांकडून समाधान
महापौर विक्रांत गोजमगुंडे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी या परिसराला शुक्रवारी प्रत्यक्ष भेट ंदेऊन नागरिकांशी चर्चा केली. या वेळी नागरिकांनी महापालिकेने घेतलेल्या काळजीबद्दल सर्वांचेच आभार व्यक्त केले. पालिकेने व प्रशासनाने केलेले सहकार्य व राबविलेल्या उपाययोजनाबाबतही समाधान व्यक्त केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या