लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरातून छात्र सैनिकांचे आत्मबल वाढते, असे प्रतिपादन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले. ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूरच्यावतीने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील एनसीसी कॅडेटचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर (एटीसी २०८) जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे दि. २८ जून ते ७ जुलै या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मोटिव्हेशनल गेस्ट लेक्चरमध्ये प्रमुख अतिथी म्हणून निखील पिंगळे बोलत होते. यावेळी कॅम्प कमांडर लेफ्टनंट कर्नल संतोषकुमार, प्राचार्य जी. रमेशराव, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. विजय राठी, उपप्राचार्य आर.रामू, प्रा. डॉ. संजय गवई, दीपरत्न निलंगेकर, डेपोटी कमांडर सुभेदार मेजर दीपक कुमार आणि कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूरतर्फे पोलीस अधीक्षक निखिल पिांळे यांना गार्ड
ऑफ ऑनर देण्यात आले. पुढे बोलताना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले की, युवकामध्ये राष्ट्राभिमानाची भावना ही अंतर्मनातून येणे अत्यंत आवश्यक आहे. आपण प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यामध्ये मनापासून कार्य करुन त्यात उज्वल यश संपादन करणे त्यासाठी योग्य दिशादर्शन होणे आवश्यक आहे. आपण वैर भावनेतून स्पर्धा न करता ती निर्मळ मनाने केली पाहिजे. आपण समाजाला सार्थ अभिमान वाटेल असे कार्य केले पाहिजे असे ते म्हणाले
यावेळी ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूरचे कमांंिडग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल संतोषकुमार प्रास्ताविक करताना म्हणाले की, ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूरद्वारा ए, बी आणि सी प्रमानपत्र असे एकूण तीन वार्षिक शिबिर आयोजित केले जातात. कोविड नंतर हा पहिलाच कॅम्प आहे. यामध्ये लातूर आणि उस्मानाबाद जिल्हातील एकूण ४६२ कडेडस सहभागी झाले आहेत. या शिबिरात शैक्षणिक मार्गदर्शनासोबत सैनिकी प्रशिक्षण, फायंिरग, ड्रिल, मॅप रींिडग, वेपण ट्रेंिनग आणि संस्कृतीक कार्यक्रम या विविध विषयावर तज्ञ प्रशिक्षकाकडून प्रात्यक्षिकासह माहिती मिळत आहे.
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट चीतमपल्ले डी.एस.,चीफ ऑफिसर मांडवकर अनिल, चीफ ऑफिसर महावीर काळे, थर्ड ऑफिसर चांदणे बाबुराव, लेफ्टनंट अर्चना टाक, लेफ्टनंट सरस्वती वायभासे, लेफ्ट. म्हावरकर आर. जी., लेफ्टनंट हरीभाऊ पावडे, आप्पासाहेब वाघमोडे, सुभेदार सत्यवान जाधव, सुभेदार दिलीप दामोदर, सुभेदार भोपाल सिंग, सुभेदार कच्छवे, नायब सुभेदार शेंडगे दिलीप, हवालदार चित्रपाल सिंग, हवालदार अमनदीप कार्यालयाचे हेड क्लर्क घोगरे बी. व्ही., जयपाल काटकर आदींचे सहकार्य मिळत आहे.