22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरचित्त्यांचे आगमन जैवगतवैभव प्राप्तीसाठी हातभार लावेल

चित्त्यांचे आगमन जैवगतवैभव प्राप्तीसाठी हातभार लावेल

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
नांबीयातून १७ सप्टेंबर रोजी भारतात होणा-या चित्त्यांचे आगमन भारताच्या जैवविविधतेस गतवैभव प्राप्त करुन देण्यास हातभार लावेल. राजबिंडया प्राण्यांच्या ऐतिहासीक आगमनाचे सर्वांनी स्वागत करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे यांनी केले.

मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात होणा-या चित्ता आगमनाच्या पार्श्वभूमिवर मांजरेश्वर हनुमान विद्यालयात उस्मानाबाद वनविभाग व लातूर जैवविविधता समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना चित्त्याबद्दल ते माहिती सांगत होते. अध्यक्षस्थानी बी. के. येचवाड होते. यावेळी जैवविविधता समितीचे सदस्य शहाजी पवार, वनपरिमंडळ अधिकारी निलेश बिराजदार, पी. एस. चिल्ले, वाय. ए. रोंगे, पी. एन. काळे, महेश पवार, बालाजी पाटील, बालाजी कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शिकारी अन अधिवासावरील आक्रमणाने भारतीय चित्त्यांना संपवले. मांसभक्षी प्राण्यांच्या संहारामुळे त्यांची संख्या घटली अन तृणभक्षी प्राणी वाढल्याने संतुलन बिघडले. तथापि भारतात चित्त्याचे आगमन होत असल्याने या ढासाळलेल्या वन्यजीव संपदेस पूर्वपदावर आणण्यास हातभार लागेल असा आशावाद व्यक्त करत रामपुरे म्हणाले की, अथक प्रयत्नांतर हे प्राणी भारतात आणण्यास परवानगी मिळाली असल्याचे सांगत त्यांनी चित्ता व बिबट यांच्यातील फरकही विद्यार्थ्यांना सांगितला. यावेळी पवार यांनी कोर्याला शौर्य माणणा-या संस्थानीकी मानसिकेतेने चित्त्यांचे संसार उठवले. अधिवासावरील आक्रमणानेही त्यास मोठा हातभार लावल्याचे स्पष्ट करीत चित्त्यांचे आगमन ही आनंददायी घटना असली तरी त्याचा वंशविस्तार व संगोपन होण्यासाठीची योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.

वनपरिमंडळ अधिकारी बिराजदार यांनी जैव साखळीत चित्त्यांची मह्तवपूर्ण भूमिका विशद करुन भारतीय चित्त्यांचा इतिहास, त्याच्या संहाराची कारणे अन त्याच्या संभाव्य आगमनासाठी करावा लागलेले कायदेशीर सोपस्कार याची विस्ताराने माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात एचवाड यांनी चित्ता आगमाबद्दल समाधान व्यक्त करुन पर्यावरण अन जैवविविधतेचे रक्षण करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुंत्रसंचलन एन. पी. कदम यांनी केले, आभार एम. व्ही पाटील यांनी मानले. कार्यक्रमास मोठया संख्येत विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या