24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरपदवीधर अंशकालीन कर्मचा-यांचे घंटानाद आंदोलन

पदवीधर अंशकालीन कर्मचा-यांचे घंटानाद आंदोलन

एकमत ऑनलाईन

लातूर : पदवीधर अंशकालीन कर्मचा-यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त पदावर तात्काळ नियुक्ती मिळावी व इतर मागण्यांसाठी बेमुदत आंदोलनाबाबत प्रशासन गंभीर नसल्याने त्याचा निषेध म्हणून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परिसर ११ जून दिवसभर घंटानाद करुन दणाणून सोडले.

दि. ६ जूनपासून पदवीधर अंशकालीन कर्मचारी बेमुदत धरणे व लक्षवेधी आंदोन करत आहेत. ७ जूनला निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली पण त्यात काहीच निष्पन्न झाले नाही असा आरोप करुन आमची केवळ दिशाभूल करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे अंशकालीनमध्ये तीव्र नाराजी पसरली असून आंदोलन तीव्र करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून दि. ११ जूनला दिवसभर घंटानाद आंदोलन करुन परिसर दणाणून सोडला. सदर आंदोलनामध्ये दिगंबर शिंदे, हनुमत क्षिरसागर, शिवाजी पवार, अरविंद उगीले, बालासाहेब केसगीर, सिध्दार्थ जाधव, भरत भिंगोले, यशवंत जाधव, प्रभाकर जाधव, गुंडेराव कदम, गिरीधर बिडवे, बालाजी कासले, संजय तिगोटे, रमाकांत मगर, धोंडोपंत कुलकर्णी, अंबादास साबणे, सूर्यकांत सुरवसे, हाशमी जाफरअली, व्यंकट वाघमारे, आदी सहभागी झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या