22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरनिसर्ग,विज्ञान कविता हा ग्रंथ साहित्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल

निसर्ग,विज्ञान कविता हा ग्रंथ साहित्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल

एकमत ऑनलाईन

बाभळगाव : निसर्ग व विज्ञान या दोन्हींचा समन्वय साधून आज जगामध्ये नवनवीन शोध लागत आहेत. यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून साहित्य क्षेत्रात लेखन झाले तर ते मानवी समाजासाठी प्रेरणादायी ठरेल. साहित्याने नाविन्याचा शोध घेताना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून निर्मतिी केली पाहिजे, देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात असा ग्रंथ येणे ही मोठी उपलब्धी आहे. हा संपादित ग्रंथ अभ्यासक, लेखक आणि संशोधकांना संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी पडेल तो साहित्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलाराव देशमुख यांनी केले.

कै.व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथे ‘नव्वदोत्तरी मराठी कवितेतील आ. य. पवार यांच्या निसर्ग व विज्ञान कविता’ या विषयावर एक दिवशीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. त्यानिमित्ताने संपादक डॉ.जयदेवी पवार यांनी संपादित केलेल्या आ. य. पवार यांच्या ‘निसर्ग व विज्ञान कविता’ या ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमास संस्थेचे सचिव शाम देशमुख, उपाध्यक्ष नरंिसंह देशमुख, कोषाध्यक्ष आयुब शेख, संचालक सुवर्णाताई मुळे, सूर्यकांत देशमुख, भीमराव शिंदे यांची उपस्थिती होती. या ग्रंथामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील विविध अभ्यासक संशोधकांनी शोधनिबंध पाठविले आहेत. त्याचे दोन विभाग करण्यात आले असून आ. य.पवार यांच्या निसर्ग कवितेवर २३ तर विज्ञान कवितेवर १९ संशोधनपर लेख आहेत.

प्रास्ताविक स्टाफ अकादमी विभाग प्रमुख डॉ. शाहूराज मुळे यांनी तर सूत्रसंचालन या ग्रंथाचे सहसंपादक डॉ.दुष्यंत कटारे व आभार प्रदर्शन इतिहास विभाग प्रमुख डॉ.नरेंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंकुश थडकर, दत्ता फुलगामे, बालाजी देशमुख आणि नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या