24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरबोरीत वीज पडून म्हैस ठार

बोरीत वीज पडून म्हैस ठार

एकमत ऑनलाईन

लातूर : तालुक्यातील बोरी येथे दि़ १४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वीज पडून म्हैस ठार झाल्याची घटना घडली़. या घटनेत शेतक-याचे ७९ हजारांचे नूकसान झाले.

लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवारी सायंकाळी ढगांचा कडकडाट व विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली़ लातूर शहरातही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. लातूर तालुक्यातील बोरी येथील दिलीप भूजंग सुरवसे यांची म्हैस वीज पडून ठार झाली़ सदर घटनेचा पंचनाम तलाठी सोमनाथ एकलिंगे यांनी केला. ते म्हणाले, दिलीप सुरवसे यांची म्हैस बाभळीच्या झाडाखाली मृत अवस्थेत होती़ सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वीज पडून ही म्हैस ठार झाली़.

विजांचा कडकडाट सुरु झाला तेव्हा दिलीप सुरवसे हे त्यांच्या शेडमध्ये सुरक्षीत ठिकाणी होते़ पंचनामा करते वेळी बोरी गावचे सरपंच सौ़ विजयमाला पाटील, उपसरपंच शंकरराव पाटीलही सोबत होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या