24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरनाला साफ केला अन् जलवाहिनी फु टली

नाला साफ केला अन् जलवाहिनी फु टली

एकमत ऑनलाईन

लातूर : गांधी चौक जलकुंभ ते डालडा फक्ट्री जलकुंभदरम्यानची जलवाहिनी फु टण्याची दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. शुक्रवारी महानगरपालिकेच्या वतीने डालडा फक्ट्रीच्या समोरील नाला जेसीबीने साफ करण्यात आला. त्यावेळी जलवाहिनी फुटली पण सप्लाय बंद असल्यामुळे जलवाहिनी फुटल्याचे लक्षात आले नाही. शनिवारी सप्लाय सुरु झाला आणि जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी त्याच नाल्याने वाहिले.

सध्या पावसाळा सुरु आहे. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नाले सफाईचे काम अंतिम टप्प्यात आहे. नांदेड रोवरील डालडा फक्ट्रीसमोर एक नाला आहे. या परिसरातील किराणा मालाचा ठोक व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. त्यामुळे कचराही मोठ्या प्रमाणात निघतो. प्लास्टीकच्या वस्तू, कॅरिबॅग, प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आदीचा मोठ्या प्रमाणातील कचरा या नाल्यात साचला होता. संपूर्ण नाला तुंबला होता. शुक्रवारी या नाल्याची जेसीबीने साफसफाई करण्यात आली. या नाल्याच्या एका बाजूने गांधी चौक जलकुंभ ते डालडा फक्ट्री जलकुंभापर्यंत १०० डायमीटरची जलवाहिनी गेलेली आहे. नाला साफसफाई करताना जेसीबीने सदर जलवाहिनी फुटली. परंतू ही जलवाहिनी बंद असल्यामुळे जलवाहिनी फुटल्याचे लक्षात आले नाही. शनिवारी जेव्हा या जलवाहिनीवरुन सप्लाय सुरु झाला तेव्हा फुटलेल्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.

जलवाहिनी फुटल्याची माहिती संबंधीत यंत्रणेला मिळाल्यानंतर गांधी चौक जलकुंभावरुन या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. तोपर्यंत या नाल्यातून संपुर्ण डालडा फॅ क्ट्रीच्या परिसरात पाणीच पाणी झाले होते. जलवाहिनी दुरुस्तीचे काम रविवारी सकाळी हाती घेतले जाणार असून जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत डालडा फॅ क्ट्री जलकुंभावरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दहा-बारा दिवसांपुर्वी याच मार्गावर राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या पाठी मागे जलवाहिनी फु टली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या