25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeउस्मानाबादमांजरा धरण शंभर टक्के भरले, ग्रीन बेल्ट सुखावला

मांजरा धरण शंभर टक्के भरले, ग्रीन बेल्ट सुखावला

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असलेले केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाची पाणी पातळी दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ६४२.३७ मीटरपर्यंत गेली आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा १०० टक्के झाला आहे. धरणाच्या पाललोट क्षेत्रात अशीच पर्जन्यवृष्टी राहिली व येवा असाच राहिला तर येणारा येवा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात येणार आहे. त्यानंतरही येवा वाढला तर अतिरिक्त येवा मांजरा नदीमार्गे सोडण्यात येणार आहे.

लातूर, केज, कळंब, अंबाजोगाई अशा मोठ्या शहरांची पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची सोय मांजरा धणातील पाण्यावरच अवलंबुन आहे. मात्र निसर्गाच्या कृपेवरच या सर्व गोष्टी आधारीत आहेत. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला तरच या शहराच्या पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. मांजरा धरणाचा प्रकल्पीय पाणीसाठा २२४.०९ दलघमी आहे.

उपयुक्त पाणीसाठा १७६.९६ दलघमी तर मृत पाणीसाठा ४७.१३० दलघमी आहे. सिंचन क्षेत्र १८ हजार २२३ हेक्टर आहे. उजवा कालवा ७६ किलोमीटर, डावा कालवा ९० किलोमीटर आहे. या धरणावर विविध १६ पाणीपुवठा योजना अवलंबुन आहेत तर ६१.९३ दलघमी एवढे पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे.

यंदा मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला. त्यामुळे मांजरा प्रकल्पा येवा सुरु झाला. पावसात सातत्य राहिल्याने दि. १ जून २०२० पासून २२०.४८ दलघमी एवढ्या पाण्याची धरणात आवक झाली. लातूर शहराचा पाणी पुरवठा मांजरा धरणावर अवलंबुन आहे. परंतुू, २०१६ मध्ये मांजरा धरण कोरडे पडले होते. त्यामुळे लातूरकरांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली होती. विशेष म्हणजे त्याच वर्षी ३० सप्टेंबर आणि १ व २ ऑक्टोबर रोजी मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठे पाऊस झाले होते.

कोरडे धरण तीन दिवसात तुडूूंब भरले होते. एकाच वर्षात मांजरा धरण कोरडे आणि भरुन वाहिले. त्यानंतर पाऊस पडला नाही. धरणातील उपयुक्त पाणीसाठा दि. २७ सप्टेंबर २०१८ रोजी संपला होता. मृतसाठ्यातील धरण याच वर्षी जीवंत झाले आणि आता १०० टक्के भरलेही.

शेतक-यांना सावधानतेचा इशारा
मांजरा धरणात येवा वाढता तर अतिरिक्त येवा मांजरा नदीमार्गे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरील, धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या काठावरील शेतकरी किंवा वसती करुा राहिलेल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

मांजरा प्रकल्प
एकूण साठा 223. 157 दलघमी
उपयुक्त साठा 176.027 दलघमी
पाणी पातळी 642.35 मी
एकूण साठा 99.58%

उपयुक्त साठा 99.47%
प्रकल्पीय एकूण साठा 224.09 दलघमी
उपयुक्त साठा 176.96 दलघमी
मृत साठा. 47.130 दलघमी
पूर्ण संचय पातळी 642.37 मी

सोपल गटाला धक्का,माजी नगराध्यक्षांच्या मुलांचा आमदार राऊत गटात प्रवेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या