30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeउस्मानाबादमांजरा धारण १००% भरल्याने २ दरवाजे उघडले

मांजरा धारण १००% भरल्याने २ दरवाजे उघडले

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहराला पाणी पुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण दि. २७ ऑक्टोेबर रोजी १०० टक्के भरले होते. सात दिवसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा येवा वाढल्याने दि. २ नोव्हेंबर रोजी धरणाचे दोन दरवाजे १० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. ९.८९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असलेले केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता १०० टक्के भरले होते.धरणाच्या पाललोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी राहिली व येवा वाढत गेला. दि. २ नोव्हेंबर रोजी धरणाचे दोन दरवाजे १० सेंटीमीटरने उघडण्यात असून ९.८९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अतिरिक्त येवा मांजरा नदीमार्गे सोडण्यात आला आहे. लातूर, केज, कळंब, अंबाजोगाई अशा मोठ्या शहरांची पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची सोय मांजरा धणातील पाण्यावरच अवलंबुन आहे. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला तरच या शहराच्या पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. मांजरा धरणाचा प्रकल्पीय पाणीसाठा २२४.०९ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा १७६.९६ दलघमी तर मृत पाणीसाठा ४७.१३० दलघमी आहे. सिंचन क्षेत्र १८ हजार २२३ हेक्टर आहे. उजवा कालवा ७६ किलोमीटर, डावा कालवा ९० किलोमीटर आहे. या धरणावर विविध १६ पाणीपुवठा योजना अवलंबुन आहेत तर ६१.९३ दलघमी एवढे पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे. या धरणाचे १२ बाय ५.५ मीटरचे १८ दरवाजे आहेत. त्यापैकी दोन दरवाजे उघड्यात आले आहेत.

यंदा मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला. त्यामुळे मांजरा प्रकल्पा येवा कायम राहिला. पावसात सातत्य राहिल्याने दि. १ जून २०२० पासून २२०.४८ दलघमी एवढ्या पाण्याची धरणात आवक झाली. होती. मांजरा धरण बांधल्यानंतर सन १९८० पासून या धरणात जलसंचय सुरु करण्यात आला. ९ वर्षांनंतर म्हणजे १९८८-८९ मध्ये हे धरण पहिल्यांदा भरले. त्यानंतर सलग तीन वर्षे शंभर टक्के भरत गेले. त्यानंतर पुढील काही वर्षे पाऊस कमी राहिल्याने धरणातील साठा कमी राहिला. मांजरा धरण उभारल्यापासून आतापर्यंतच्या ४० वर्षांत हे धरण भरण्याची दि. २७ ऑक्टोबर २०२० ची ही १४ वी वेळ आहे.

नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
मांजरा धरणात येवा वाढत गेल्याने दि. २ नोव्हेंबर रोजी धरणाचे दोन दरवाजे १० सेंटीमीटरने उघडून अतिरिक्त येवा मांजरा नदीमार्गे सोडण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरील, धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या काठावरील शेतकरी किंवा वसती करुन राहिलेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

ऑक्टोबरमध्ये १ लाख ५ हजार कोटी जीएसटी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या