18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरमांजरा कारखान्याची चार दशकाची वाटचाल दीपस्तंभाप्रमाणे

मांजरा कारखान्याची चार दशकाची वाटचाल दीपस्तंभाप्रमाणे

एकमत ऑनलाईन

विलासनगर : ऊस उत्पादक शेतक-यांच्या कष्टाचे मोल ओळखून विकासरत्न विलासराव देशमुख यांनी पाया रचलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ४ दशकाची वाटचाल दीपस्तंभा प्रमाणे असल्याचा अभिमान सर्वाना असून, मांजरा कारखाना हा सहकार क्षेत्रातले भूशण ठरले असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे सन्माननीय संचालक, राज्याचे वैद्यकिय षिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यानी केले.

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २५ सप्टेंबर रोजी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमी ऑनलाईन पध्दतीने उत्साहाच्या वातावरणात झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा चेअरमन दिलीपराव देशमुख हे होते. तर ऑनलाईन पध्दतीने राज्याचे वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा संचालक अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांची उपस्थिती होती. तर प्रत्यक्षपणे जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाट, विलासचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, ट्वेन्टीचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, संत शिरोमणी कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, व्हाईस चेअरमन शाम भोसले, मांजराचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक एच. जे. जाधव, विलास-१ चे कार्यकारी संचालक संजीव देसाई, जागृतीचे प्रकल्प व्यवस्थापक सुनिल देशमुख, रेणाचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, सचिव रवीशंकर बरमदे, कार्यलक्षी संचालक, श्रीनिवास देशमुख, सचिन दाताळ, सतीष पाटील आदिची उपस्थिती होती.

वार्षिक सर्व साधारण सभेत बोलताना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले की, चार दशकापासून मांजरा कारखान्याची वाटचाल गौरवाची व शेतकरी सभासदाना न्याय मिळवून देणारी ठरली आहे. शेतक-यांची आर्थीक उन्नती साधली जात असताना, मांजरा परिवारातील सर्व कारखान्यांनी आधुनिकतेचा स्विकार करुन काळाचा वेध लक्षात घेत अनेक विकास योजना अवलंबल्या. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वात मांजरा परिवार भविष्यातदेखील आपली बांधीलकी जोपासत राहील, असा विश्वास व्यक्त करून येणा-या गळीत हंगामास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

आपल्या मनोगतात लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, साखर आयुक्त कार्यालयाकडून वेळेत पुर्ण एफआरपी आदा केलेल्या साखर कारखान्याच्या यादीत मांजरा परिवारातील साखर कारखान्याचे असलेले नाव हे मांजरा परिवाराच्या नेतृत्वाने दिलेला शब्द पाळला जातो. याचे प्रतिक आहे. सध्या पाऊस समाधानकारक पडला असून, त्यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. अशा वेळी उपलब्ध पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे केले जावे, असे आवाहन त्यानी केले. आपल्या प्रास्तावीकपर मनोगतात व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे यानी सभासदा समोर कारखान्याच्या यशस्वी वाटचालीचा आढावा सादर केला. यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यानी विषय पत्रिकेवरील सर्व विषयाचे वाचन केले. त्यास संचालकानी सुचक व अनुमोदन दिले. व सभासदानी टाळयाच्या गजरात सर्व विषयाना मंजुरी दिली. ऑन लाईन पध्दतीने या वार्षिक सर्व साधारण सभेस शेतकरी सभासद मोठया संख्येने सहभागी झाले होते.यावेळी आभार प्रदर्शन संचालक कैलास पाटील यांनी केले. तर सुत्र संचलन प्रा. सचिन सुर्यवंशी यांनी केले.

‘ते’ आंदोलन विरोधासाठी विरोध
आपल्या अध्यक्षीय मनोगतात सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब म्हणाले की, दुष्काळ व कोरोना आजाराने जन जीवन ठप्प पडले होते. अशा बिकट परिस्थीतीतून मांजरा परिवारातील साखर कारखान्यानी मागील गळीत हंगाम यशस्वी करुन, जिल्ह्याच्या आर्थीक स्थैर्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. ४० वर्षापूर्वीचे लातूरातील शहर व ग्रामिण भाग व आत्ताचा झालेला विकास याचा मागोवा घेतल्यास निश्चित मांजरा परिवाराचे जिल्ह्याच्या विकासातील योगदान लक्षात येते. ऊस उत्पादक शेतक-याना त्यांची शेती सहजपणाने करता यावी, यासाठी उत्तम दर्जाचे बियाणे, खताचा पुरवठा, लागवडीसाठी कर्ज, ऊसाचे गाळप या बाबीतील नियोजन तत्परतेने केले. हे करत असताना, काटकसरीचा अवलंब करून सभासदांचे हीत जोपासले. शासनाकडून निर्धारित केलेल्या एफआरपी दरानूसार मांजरा परिवारातील साखर कारखान्यानी एफआरपीची रक्कम वेळेत आदा केली आहे. त्यामुळे विरोधकानी केलेले आंदोलन हे केवळ विरोधासाठी विरोध यासाठीच होते. लातूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला देशभरात गौरविले जाते. त्यामुळे या यशाला काळीमा फासण्याचे काम विरोधकानी करु नये, असे आवाहन करुन मांजरा परिवारातील कर्मचा-यांना दिपावली निमित्ताने १० टक्के बोनस त्यांनी जाहिर केला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या