29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home लातूर चिकनवाल्यांचा व्यवसाय ७५ टक्के कोलमडला

चिकनवाल्यांचा व्यवसाय ७५ टक्के कोलमडला

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोना महामारीच्या संकटातून सावरत असतानाच बर्ड फ्लूच्या संसर्गाने हात पाय पसरले. लातूर जिल्ह्यात आजही अनेक ठिकाणी पक्षी मरुन पडण्याचे सत्र सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने युद्धपातळीवर उपाययोजना केल्या असल्या तरी बर्ड फ्लूच्या चर्चेने लातूर शहरातील चिकन व्यवसायिकांचा ७५ टक्के व्यवसाय कोलमडला आहे.

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी व उदगीर तालुक्यातील तोंडार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वंजारवाडी व सुकणी येथील कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. मरण पावलेल्या कोंबड्यांना एच-१, एन-१ या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लूची एकच चर्चा सुरु झाली. बर्ड फ्लू कशाने होतो, कशाने नाही, बर्ड फ्लू टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भाने पशुसंवर्धन विभागाने जनजागृतीपर आवाहनही केले. बर्ड फ्लूचा जिल्ह्यात इतर ठिकाणी संसर्ग होऊ नये, याची काळजी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तातडीने घेण्यात आली. जिथे जिथे धोक्याची शक्यता आहे तेथील नमुने संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतू, कोरोना महामारीशी लढा दिल्यानंतर आता बर्ड फ्लूचे संसर्ग नको, अशी सर्वांचीच भावना झाल्याने त्याचा परिणाम चिकन व्यव्सायिकांवर झाला आहे.

लातूर शहरात घाऊक चिकन विक्रेत्यांची सात ते आठ दुकाने आहे तर किरकोळ विक्री करणा-यांची १२५ पेक्षा अधिक दुकाने आहेत. लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग येण्यापूर्वी लातूर शहराला दररोज १५ टन चिकन लागत असे आजघडीला ५ टनही चिकन विकले जात नाही. किरकोळ चिकन विक्रेत्यांचा धंदा जवळपास बंद होण्याच्या मर्गावर आहे. तर घाऊक चिकन विक्रेते मात्र दुहेरी संकटात सापडले आहेत.

बर्ड फ्लूच्या संसर्गामूळे चिकनची मागणी घटली. त्यामुळे त्यांच्याकडील कोंबड्या विकल्या जात नाहीत तर दुसरीकडे या न विकलेल्या कोंबड्यांना जगवण्यासाठी प्रचंड खर्च सहन करावा लागत आहे. पदरमोड करुन कोंबड्या जगवाव्या लागत आहे. पोल्ट्री खाद्य सरकारकडून मिळाले तरी आम्हाला ब-यापैकी सहकार्य होईल, असे एका व्यापा-याने सांगीतले.

दिवसाला दोन हजार रुपयांचा खर्च
बर्ड फ्लूच्या संसर्गाने चिकन व्यवसायिकांवर संक्रांत आली आहे. घाऊक चिकन व्यवसायिकांची खुप मोठी अडचण झाली आहे. चिकनची मागणी ७५ टक्के घटली आहे. त्यामुळे कोंबड्या जगवण्याची कसरत करावी लागत आहे. कोंबड्यांचे खाद्य व इतर खर्च मिळूुन दिवसाला २ हजार रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. चिकन व्यवसायिकांचे मोठे नूकसान झाले असून नोकरांचा पगार निघणेसुद्धा अवघड झाले आहे, असे लातूर जिल्हा चिकन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जाफर शेख यांनी सांगीतले.

‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये आयर्न मॅन कृष्णप्रकाश यांची नोंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या