22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरपशुसंवर्धनच्या फिरत्या दवाखान्यांवर मुख्यमंत्री अजूनही उद्धव ठाकरेच !

पशुसंवर्धनच्या फिरत्या दवाखान्यांवर मुख्यमंत्री अजूनही उद्धव ठाकरेच !

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील लातूर, औसा व देवणी तालुक्यातील पशुपालकांच्या पशुधनास वेळेत आरोग्याच्या सेवा मिळाव्यात म्हणून मुख्यमंत्री पशुस्वस्थ्य योजेनेतंर्गत फिरता पशुचिकित्सा दवाखाना तीन व्हॅनच्या माध्यमातून दीड वर्षापासून सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने चालणारी योजना राज्याचे मुख्यमंत्री बदलले तरी माजी मुख्यमंत्र्याचाच प्रभाव अजूनही लातूरच्या जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयावर दिसून येत आहे. राज्यातले सरकार बदलून नवे मुख्यमंत्री येऊन दोन महिने झाले तरी जुन्याच मुख्यमंत्र्याचा फोटो असलेली फिरता पशुचिकित्सा दवाखान्याची गाडी गावागावातून दिमाखात फिरताना दिसून येत आहे.

मुख्यमंत्री पशुस्वस्थ्य योजेनेतंर्गत लातूर जिल्हयातील लातूर, औसा व देवणी तालुक्यात फिरता पशुचिकित्सा दवाखाना तीन व्हॅनच्या माध्यमातून दि. २० फेबु्रवारी २०२१ पासून सुरू करण्यात आला. पशुपालकांचे पशुधन आजारी पडल्यास त्या पशुधनावर उपचार करण्यासाठी १९६२ या टोल फी नंबरवर फोन केल्यास त्यांना या फिरत्या पशुचिकित्सा व्हॅनच्या माध्यमातून उपचार वेळेत उपलब्ध होतात. अथवा त्या परिसरातील पशुचिकित्सालयात उपचार करण्यात येतात. महाराष्ट्रात ३० जून रोजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेवून राज्याचे सुत्र हाती घेतली. गेल्या आडीच महिण्यापासून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे राज्याचे कामकाज पहात आहेत.

लातूरच्या जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातंर्गत चालणा-या फिरता पशुचिकित्सा दवाखान्याच्या तीन व्हॅनवर अजूनही माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा फोटो गेल्या आडीच महिण्यापासून कायम आहे. राज्याचे मुख्यमंत्री बदलले तरीही अजून माजी मुख्यमंत्र्याचा फोटो फिरत्या दवाखान्याच्या व्हॅनवर कायम असल्याने सदर फोटो आणखी किती दिवस कायम राहणार अशी नागरीकांमध्ये वेगळीच चर्चा होत आहे. या पशुचिकित्सा व्हॅनच्या माध्यमातून पशुधनावर औषधोपचार, कृत्रिम रेतन, वंधत्व निदान व उपचार, प्रथमोपचार सुक्ष्मदर्शक यंत्राद्वारे रोगाचे निदान करून केले जात आहेत. तसेच पशुधनास विषबाधा, संर्पदंश, जखमा झाल्या आसल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठीची सोय आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या