अहमदपूर :भारत देशाने सबंध विश्वामध्ये नेत्रदीपक भरारी घेतली आहे परंतु देशाच्या ग्रामीण आणि शहरी विभागातील बालविवाह रोखण्यात आपल्याला फारसे यश आलेले नाहीत. त्यामुळे शासनस्तरावर बाल विवाह रोखण्यासाठी विशेष समिती नेमून हे बालविवाह थांबवावेत आणि मुलींना खास करून शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे असे आवाहन प्रसिद्ध लेखक, समीक्षक, बाल विवाह प्रतिबंधक लढ्याचे प्रमुख हेरंब कुलकर्णी यांनी केले.
राज्यात बाल विवाह का होतात हे विवाह ग्रामीण आणि शहरी भागात कुठे होतात याचा शोध आणि बोध करण्याप्रसंगी येथील न्यू शॉंिपग सेंटर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण काळे, प्रमुख पाहूणे लेखक मोहिब कादरी, सहशिक्षक रामंिलग तत्तापुरे ,रमाकांत नागठाणे, गजानन भुसारे, रामनिवास भुतडा, गजानन आंधळे ,हरी कोटलवार हे उपस्थित होते.
यावेळी हेरंब कुलकर्णी म्हणाले की, या देशात दारूबंदीचा लढा उभारला पाहिजे, विधवा झालेल्या मुलींचा पुनर्विवाह अग्रक्रमाने केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाल विवाहाच्या प्रथा कायमस्वरूपी बंद होण्यासाठी आपण सर्वांनी सकारात्मक आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले.
यावेळी मोहिब कादरी, रामंिलंग तत्तापुरे यांची भाषणे झाली. अध्यक्षीय समारोप सत्यनारायण काळे यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत येणगे यांनी तर आभार रामेश्वर झेरीकुंटे यांनी मांनले. यावेळी प्रसिद्ध लेखक हेरंब कुलकर्णी यांचा इच्छापूर्ती हनुमान मंदिराच्या वतीने रमाकांत नागठाणे यांच्या हस्ते ग्रंथ, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इच्छापूर्ती हनुमान मंदिराच्या पदाधिका-यांनी विशेष परिश्रम घेतले.