22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरलातूर शहराचा ‘एनसीएपी’मध्ये समावेश

लातूर शहराचा ‘एनसीएपी’मध्ये समावेश

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहराची वाढती लोकसंख्­या पाहता सध्­या उपलब्­ध असलेली वाहतुक व्­यवस्­था पुरेशी ठरणार नाही. त्­यामुळे सार्वजनिक वाहतुक व्­यवस्­थेचा विस्­तार होणे आवश्­यक आहे. त्­या करीता शहरातील वाहतुक व्­यवस्­थेचे बळकटीकरण करण्­याच्­या दृष्­टीने शहराचा कॉम्परेहन्सीव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्­यात आला आहे. लातूर शहर महानगरपालिकेचा समावेश नॅशनल क्लीन एअर प्रोग्राममध्ये (एनसीएपी) करण्यात आलेला आहे.

एनसीएपीअंतर्गत शहरातील वायु प्रदुषण कमी करण्­यासाठी दीर्घकालीन उपाय योजनेमध्­ये लातूर शहराचाकॉम्परेहन्सीव्ह मोबिलिटी प्लॅन सर्वसमावेशक वाहतुक व्­यवस्­था आराखडा तयार करण्­यासाठी समावेश आहे. सदर कॉम्परेहन्सीव्ह मोबिलिटी प्लॅनचा गोषवारा ६६६.ेू’ं३४१.ङ्म१ॅ या मनपा संकेतस्­थळावरुन प्रसिध्­द करण्­यात आला आहे. तरी अर्बन मास ट्रन्­सीस्­ट कंपनी लिमीटेड न्­यु. दिल्­ली या कंपनीमार्फत सादरीकरण दि. २९ जून रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिका सभागृहात होणार आहे. तरी इच्छुक सेवाभावी संस्­थांनी महानगरपालिकेत सहभाग नोंदवणे. सहभाग नोंदविण्­यासाठी दि. २८ जूनच्­या पुर्वी समन्­वय फजल शेख (७५०७५५९९८६) यांच्­याशी संपर्क साधावा.

लातूर शहराची २०११ च्या जनगणनेनूसार ३ लाख ८२ हजार ९८५ एवढी लोकसंख्या आहे. सद्यस्थितीत अंदाजीत मध्यवर्ती लोकसंख्या ४ लाख ५४ हजार ५११ इतकी आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकसंख्या २ लाख ५५ हजार ५०० आ.े ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील लोकसंख्या ७५ हजार २००, ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटात ५३ हजार १०० एवढी आहे. लातूर शहराची वाढती लोकसंख्य पाहता सध्­या उपलब्­ध असलेली वाहतुक व्­यवस्­था पुरेशी ठरणार नाही. त्­यामुळे सार्वजनिक वाहतुक व्­यवस्­थेचा विस्­तार होणे आवश्­यक आहे. त्याकरीता लातूर शहर महानगरपालिकेचा समावेश नॅशनल क्लीन एअर प्रोग्राममध्ये (एनसीएपी) करण्यात आलेला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या