उदगीर : महाराष्ट्र शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुटका विक्रीला कायम बंदी असून गुटखा विके्रत्यावर कारवाईचे आदेश संबंधित विभागाला दिल्यानंतरही उदगीर तालुक्यात व शहरामध्ये सर्वत्र गुटख्याची तस्करी खुलेआम होत असल्याचे दिसून येते. गुटख्याची सध्याची विक्री पाहता शहर गुटख्याचे माहेरघरच बनले आहे की काय असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे.
गुटका तस्कर हे शेजारच्या कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटका आणून उदगीर शहराच्या मध्यभागी साठविला जात असल्याचेही बोलले जाते. त्यानंतर हा गुटखा पुन्हा शहरातील बसस्थानक परिसर चौबारा रोड उमा चौक, शिवाजी चौक देगलूर रोड या परिसरात खुलेआम विक्री केली जाते. उदगीर शहरांमध्ये हा गुटका रातोरात पुरवठा केला जातो गुटका कोणत्या गाडीत येतो, किती वाजता येतो. ही सर्व माहिती संबंधित पोलिस कर्मचा-यांना माहीत असते तरीदेखील त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नाही.
संबधित गुटकेवाला या पोलिसांना आर्थिक व्यवहार करूनच गुटख्याची देवाण-घेवाण करीत असल्याचे बोलले जाते. शहरातील एखाद्या ठिकाणी जाऊन कायदेशीर कार्यवाईचे नाटक केल्यानंतर पुन्हा गुटख्याची जोमाने विक्री खुलेआम केली जाते. या विक्रीला कायम प्रतिबंध लावण्यासाठी उदगीर शहरातील प्रशासकीय यंत्रणा केव्हा कारवाई करणार असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.
पिंपळा परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा