30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home लातूर शिवगर्जनेने शहर दुमदुमले

शिवगर्जनेने शहर दुमदुमले

एकमत ऑनलाईन

लातूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती दि. १९ फेब्रुवारी रोजी लातूर शहरात अभुतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वरुढ पुतळ्यासमोर हजारो शिवभक्त नतमस्तक झाले. सकाळी काढण्यात आलेली दुचाकी रॅली लक्षवेधी ठरली. संपूर्ण दिवसभर शहरात शिवजन्मोत्सवाचा उत्साह सुरु होता. शिवरायांचा जयजयकाराने संपुर्ण शहर दुमदुमून गेले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव अतिश्य उत्साहात साजरा करण्यात आला. अलोट गर्दी आणि अभूतपूर्व उत्साह दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्यास सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, आमदार धिरज विलासराव देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील, भगवान माकणे, प्रा. सुनिल नावाडे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, साहित्यिक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरीकांनी अभिवादन केले. शहरातील सर्वच प्रमुख चौकांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करुन स्वागत मंच उभारण्यात आले होते. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या जयजयकाराने संपूर्ण शहर दुमदुमले.

विश्वबंधुत्व, विश्वकल्याण या तत्वांना प्रत्यक्षात उतरविणारे जाणते राजे, जागतिक योध्यांचे व क्रांतीकारांचे प्रेरणास्थान असलेले राजे, मानवतावादी व लोककल्याणकारी तत्वांचे निर्माते राजे, शेतक-यांना, कष्टक-यांना, अबलांना आधार देणारे रयतचे राजे, सामाजिक विषमतेला मुठमाती देणारे राजे, बहुजन प्रतिपालक कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती लातूर शहरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात अलोट गर्दी आणि अभूतपूर्व उत्साह दिसून आला.

तरुणाईचा अभूतपुर्व उत्साह
कोरोना प्रतिबंधात्म उपाययोजनांचे पालण करीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण शहरात, घराघरात शिवजन्मोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह होता. तरुणांनी दुचाकी रॅली काढली होती तर बच्चे कंपनीने सायकलला भगवा झेंडा लावून शिवराच्यांच्या जयजयकारात सायकल फेरी काढली.

सनईचे मंजुळ स्वर… तुतारींचा निनाद… ढोल- ताशांची सलामी…
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर तरुणांनी शहरभर दुचाकीवरुन फेरफटका मारीत जय जय जय जय… भवानी, जय शिवाजी अशा गगणभेदी घोषणा दिल्या. सनईचे मंजुळ स्वर… तुतारींचा निनाद… ढोल- ताशांची सलामी… अशा उत्साहपूर्ण वातावरणात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे व अखंड महाराष्­ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

छत्तीसगडमध्ये पेट्रोल १२ रुपयांनी स्वस्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या