22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeलातूररंगकर्मींनी संकल्प केला पण प्रयत्न राहिले

रंगकर्मींनी संकल्प केला पण प्रयत्न राहिले

एकमत ऑनलाईन

लातूर : एजाज शेख
रंगभूमीवर कार्यरत असणा-यांबरोबरच नव्या मंडळींच्या नाट्य जाणिवा विकसीत करीत मराठी नाटकाला नवे आयाम देण्यासाठी उत्तम नाट्य संस्कार झाले पाहिजेत, अशी अपेक्षा रंगकर्मींसह या क्षेत्राशी निगडीत नाट्य रसिकांचीसुद्धा आहे. एकेकाळी लातूरच्या रंगभूमीचा संपुर्ण महाराष्ट्रात दबदबा होता. सूर्वण अक्षरात लिहून ठेवावा, असा तो काळ. परंतू, काळ बदलत गेला आणि लातूच्या हौशी रंगभूमीला काहीशी मरगळ आली. लातूरचे रंगकर्मी जिथे कुठे भेतील तिथे रंगभूमीवरच चर्चा करीत आजही तीच परिस्थिती आहे. नूसती चर्चा करुन काहींच होणार नाही, हे लक्षात घेऊन गेल्या वर्षी मराठी रंगभूमीदिनी लातूरच्या सर्वच रंगकर्मींनी एकत्र येत मरगळलेल्या रंगभुमीला उर्जितावस्था आणण्याच संकल्प केला होता. परंतू, त्या अनुषंगाने आवश्यक प्रयत्न राहून गेले. ते प्रयत्न किमान या वर्षीतरी व्हावेत, अशी अपेक्षा रंगकर्मींमधूनच व्यक्त केली जात आहे. तसेच झाले तर पुन्हा एकदा लातूरच्या रंगभूमीला चांगले दिवस येतील यात शंका नाही.

लातूरच्या रंगभूमीची मरगळ झटकण्यासाठी गतवर्षी लातूरच्या समस्त रंगकर्मींनी एकत्रीत येत मराठी रंगभूमी दिन साजरा केला होता. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अतुल देऊळगावकर, ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडे, ज्येष्ठ रंगकर्मी मोहन माने, अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, डॉ. अशोक आरदवाड, संजय अयाचित, श्रुतीकांत ठाकूर, सुनिता कुलकर्णी यांच्या पुढाकाराने लातूरचे रंगकर्मी एकत्र आले होते. गटातटाचे बंधने तोडून सर्व रंगकर्मींनी सर्वांना पुरक ठरेल, अशाी एक आदर्श आचारसंहिता तयार करीत त्यामाध्यमातून अधिकाधिक नाट्यअविष्कार रंगमंचावर आणावेत.

नाटकापासून दुरावलेला प्रेक्षक पुन्हा कसा जोडला जाईल यासाठी प्रयत्न करीत युवावर्गात ही नाट्यचळवळ प्रभावीपणे घेऊन जाऊण्याचा उपाय केला पाहिजे. लातूरला अखील भारतीय मराठी नाट्यसंमेलन खेचून आणण्यासाठी विशेष कृतीशील कार्यक्रम आखले जावेत, लातूरच्या विविध नाट्यसमुहांना सहकार्य करणे, महाविद्यालयीन युवकांना युवक महोत्सव आणि इतर नाट्य स्पर्धेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी जुन्या-जाणत्या रंगकर्मींनी पुढे आणावे, जुन्या-नव्यांचा मेळ घातील चांगली नाट्यकृती करावी, अशा विविध विषयांवर अतिश्य गांभीर्यपुर्वक चर्चा झाली होती. तसा संकल्पही करण्यात आला होता. परंतू, त्यादृष्टीने आवश्यक ते प्रयत्न राहूण गेले.

यावेळी महाराष्ट्र राज्य चित्रपट परीक्षण मंडळाचे सदस्य नागसेन कामेगावकर, आनंद सरवदे, प्रशांत जानराव, अनिल कांबळे, विजय मस्के भारत थोरात प्रदीप भोकरे, प्रा. संभाजी धनवे श्रृतिकांत ठाकूर डॉ. व्यंकट येलाले, डॉ. मुकूंद भिसे, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. सत्यविजय जाधव, डॉ. मिलींद पोतदार, राजकुमार माने, दिनकर कुलकर्णी, एजाज शेख, किरण बनसोडे, हिरा शेख, मोहन देशपांडे, अशोक कांबळे, प्रा. वेदपाठक, सुरेश गीर, दिलीप ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आज मराठी रंगभूमी दिन आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा गतवर्षी केलेल्या संकल्पपुर्तीचा संकल्प करण्याची आवश्यकता
आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या