24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरबाभळगावपासून सुरुवात झालेली स्पर्धा राज्यस्तरावर घेऊन जाणार

बाभळगावपासून सुरुवात झालेली स्पर्धा राज्यस्तरावर घेऊन जाणार

एकमत ऑनलाईन

चाकुर : लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने बाभळगावपासून सुरुवात झालेली स्पर्धा राज्य स्तरापर्यंत घेऊन जाणार असल्याचे सुतोवाच आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले. सोमवारी संध्याकाळी या चॅम्पियन किक्रेट स्पर्धेचे मार्गदर्शक आमदार धिरज देशमुख यांनी चकूर येथे स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी मैदानांवर सवाद्य व फटाक्यांच्या अतिषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

जिल्हाभरात १० तालुक्यांत व लातूर शहर अशा ११ ठिकाणी विलासराव देशमुख चॅम्पीयन किक्रेट स्पर्धा सुरू झाल्या आहेत.आमदार धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात किक्रेट स्पर्धा सुरू झाल्याने किक्रेट खेळाडूमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मोठा दिलासा मिळाला आहे. स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजन केल्याबदल सर्वच संयोजन टीमचे त्यांनी अभिनंदन केले. तालुकास्तरावर सुंदर व नियोजित स्पर्धा होत.असल्याबदल समाधान व्यक्त केले.आमदार धिरज देशमुख उपस्थित झाल्यामुळे खेळाडुना प्रोत्साहन मिळाले व त्याच्यातील सूप्तगुणांना वाव मिळाला. सामना संपल्यानंतर सामन्यातील सामनावीर पुरस्कार त्यांच्या हस्ते देण्यात आले.अष्टपैलू खेळ खेडुन संघास विजय करणा-या खेळाडु संदीप याला सामनावीर घोषित करण्यात आले.

आमदार धीरज विलासराव देशमुख म्हणाले की, सध्या मैदानी खेळही मोबाईल स्क्रीनवर खेळले जात आहेत. जे कोणी मैदानावर खेळायचे ते कोरोनामुळे बंद झाले, ही सर्व परिस्थिती बदलून सर्वांना पुन्हा मैदानावर खेळण्यास प्रवृत्त करण्यासाठी या स्पर्धेचे विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खेळवली जात आहे.

मैदानी खेळ हे जुनं ते सोनं आहे. त्याला चालना देण्यासाठी ही स्पर्धा ग्रामीण भागात खेळवली जात आहे. मांजरा परिवाराच्या सौजन्याने ही स्पर्धा सुरु केली आहे. यात लातूर जिल्ह्यातून ४०० संघ सहभागी झाले आहेत. तालुकास्तरावरील सामने झाल्यानंतर मुख्य सामने टाऊन हॉल येथे होणार आहेत. प्रत्येक गावातील खेळाडू या क्रीडा स्पर्धेत उतरावे, लाँग टर्म धोरण ठेवून ग्रामीण टी १० स्पर्धेचे हे पहिले पाऊल आपण टाकत आहोत. या स्पर्धेला राज्यस्तरावर घेऊन जायचे आहे. बाभळगावपासून याची सुरुवात झाली आहे असे सांगून आगामी काळात संस्थांनी खेळाडू म्हणून सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जल्हिा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, २० वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख,जिल्हा कॉग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ, विलासराव पाटील, शहराध्यक्ष पप्पुभाई शेख, नगरसेवक भागवत फुले, अनिल चव्हाण, निलेश देशमुख, सलीमभाई तांबोळी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या