लातूर : संयुक्त ७/१२ असलेल्या शेतकºयांना विमा भरण्यासाठी स्टॅम्प पेपरवर संमती पत्र देण्यासाठी लॉकडाउनमुळे स्टॅम्प उपलब्ध होत नाहीत व विमा भरण्याची अंतिम दि़ ३१ जूलै असल्याने ही अट शिथिल करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी जिल्हाधीकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या खरीप हंगाम २०२० च्या पिकांचा विमा भरणे सुरु आहे ज्याचा अंतीम दि़ ३१ जुलै आहे. तर जिल्ह्यात ३१ जूलैपर्यंत लॉकडाउनही आहे. त्यामुळे विमा भरण्यासाठी शेतक-यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठ्यांनी शेतकºयांपर्यंत ७/१२ पोहचवण्याचे काम केले आहे व जिल्हा बँक गटसचिवांमार्फत गावातच विमा भरुन घेणार आहे, परंतु विमा भरीत असताना संयुक्त खातेदार असलेल्या शेतकºयांना त्यांच्यापैकी एकाच्या नावाने विमा भरण्यासाठी स्टॅम्प पेपरवर इतर खातेदारांनी संमतीपत्र देणे आवश्यक असते. मात्र लॉकडाऊनमुळे शेतक-यांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे अवघड आहे. तेथे जाऊनही स्टॅम्पची दुकाने बंद आहेत. त्यामुळे लॉकडाऊन असेपर्यंत स्टॅम्प मिळणे अशक्य आहे.
तसेच पिक विमा भरण्यासाठी एकाच शेतक-याची जमीन दोन किंवा अधिक गटात असेल तर प्रत्येक गटाला वेगळ्या अर्जाची मागणी करण्यात येत आहे. एका अर्जासोबत सात-बारा, पिक पेरा आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रे जोडणे म्हणजे नाहक प्रत्येकी किमान ५० रुपयांचा भूर्दंड शेतक-यांना सोसावा लागत आहे.
त्यामुळे कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन च्या काळात शेतक-यांना स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र व प्रत्येक गटाला वेगळ्या अर्जाची अट शिथिल करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे केली आहे.
Read More रश्मी ठाकरेंच्या रक्षकाला कोरोना