32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरवाळू मिळत नसल्याने घरकुलांचे बांधकाम रखडले

वाळू मिळत नसल्याने घरकुलांचे बांधकाम रखडले

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यात पंतप्रधान आवास योजना तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर झालेली आहेत, असे असले तरी या घरकुल बांधकामासाठी गरिबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरकुल बांधकामासाठी वाळूची आवश्यकता असते परंतु ही वाळू जळकोट तालुक्यात मिळत नसल्यामुळे जळकोट तालुक्यातील शेकडो घरकुलधारकाचे स्वप्न अर्धवटच राहिले आहे. प्रशासनाने या घरकुल धारकांना मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

जळकोट तालुक्यामध्ये सन २०१९-२०-२१ अंतर्गत रमाई आवास योजनेचे १४४ तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २३३ घरकुले मंजूर, तसेच यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर झाली होती परंतु अनेक घरकुले अद्यापी अर्धवट अवस्थेत आहेत, प्रशासन घरकुल बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना देत आहे असे असले तरी ज्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत त्यांच्या मागे अनंत अडचणी असल्यामुळे तसेच घरकुल बांधकामासाठी जे साहित्य लागते ती वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक घरकुलांचे काम अर्धवट आहे. सद्यस्थितीत तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २७९ तर रमाई आवास योजनेअंतर्गत २६४ घरकुलाचे बांधकाम अर्धवट आहे.

जळकोट तालुका डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो एकदा का या तालुक्यातील खरीप हंगाम संपला की तालुक्यातील सामान्यांच्या कामासाठी परराज्यात स्थलांतर करावे लागते, अशा परिस्थितीत काही जणांना घरकुले मंजूर झाली आहेत, परंतु शासनाचा जो निधी मिळतो त्यावर घरकुल बांधकाम होणे अशक्य आहे, आज पाच ब्रास वाळूचीकिंमत ४० हजाराच्यावर पोहोचली आहे, आणि ही वाळूही मिळणे कठीण झाले आहे, यामुळेच सामान्यांना घरकुल बांधकामासाठी वाळू मिळणे कठीण बनले आहे. वाळू नसल्यामुळे आज शेकडो घरकुल बांधकामे रखडली असल्याचे चित्र तालुक्यात आहे.

घरकुलांना मोफत वाळू द्यावी
जळकोट तालुक्यामध्ये दोन हजाराच्या वर घरकुले मंजूर आहेत, या घरकुलांना बांधकामासाठी वाळू मिळणे कठीण झाले आहे, जळकोट तालुक्यातील सरपंच तसेच उपसरपंच यांनी लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळावी अशी मागणी केली आहे यामुळे जळकोट तालुक्यातील गोरगरिबांच्या घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

गटविकास अधिका-यांनाही निवेदन
जळकोट तालुक्यात ५३३ घरकुल लाभार्थ्यांची घरे अपूर्ण आहेत यांना ब्रास वाळू या आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना घर बांधकाम करण्यासाठी २६०० ब्रास वाळू लागणार आहे, शासनाच्या निर्णयानुसार या लाभार्थ्यांना झिरो रॉयल्टी नुसार वाहतूक खर्च लाभार्थ्याकडे लावून प्रति लाभार्थी पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून द्यावी या मागणीचे पत्र गट विकास अधिकारी जळकोट यांनी तहसीलदार जळकोट यांना पाठविले आहे

दुचाकी चोरांची टोळी गजाआड ; ३३ दुचाकी जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या