22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeलातूरदुबार पेरणीच्या संकटामुळे शेतक-यांची चिंता वाढली

दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतक-यांची चिंता वाढली

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : गेले काही दिवस अधूनमधून पडणा-या पावसाने रविवारी दुपारी तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. या मुसळधार पावसाने शेती जलमय झाली आहे.तालुक्यात सध्या पेरणी सुरू असताना पावसाने चांगलेच झोडपले असल्यामुळे रविवारची पेरणी वाया जायची चिन्ह दिसत असून या पावसाने शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत असल्याने शेतक-यांंचीचिंंता वाढली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात म्हणावा तसा पावसाला जोर नव्हता. त्यात हलक्या पावसावर शेतक-यांनी पेरणीला सुरुवात केली. महागडे बियाणे व खते काळ्या आईच्या ओटी भरली.रविवारी सकाळपासून स्वच्छ वातावरण असल्याने पेरणी सुरु होती. मात्र दुपारी ४ वाजता मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पेरलेले बियाणे वाहून गेले तर जमिनीवर पाणी थांबल्याने बी उगवण अडचणीत आली असल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे.

दरम्यान पुर परिस्थितीसह अनेक संकटांना सामोरे जात अडचणीत आले असतानाही शेतकरी मोठ्या उमेदीने अडचणीचा सामना करत बि- बियाणे व खतांची जुळवाजुळव करून पेरणीच्या कामाला लागला. अल्पशा ओल असतानाही पुढील पावसाच्या भरवशावर पेरणी सुरू केली. मात्र रविवारच्या मुसळधार पावसाने शेतक-यांंच्या स्वप्नावर व खर्चावर विरझन पडले असून मोठा लागवड खर्च करून ही मुसळधार पावसाने पेरणी संकटात आल्याने आता दुबार पेरणी करावी,लागते की काय या भितीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेत शिवारात तळ्याचे स्वरुप
खरीपाची पेरणी सुरू असताना तालुक्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. संततधार कोसळणा-या या पावसामुळे तालुक्यातील शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरुप निर्माण झाले आहे. रविवारी पेरलेले बियाणे वाहून गेले असून त्यात पाणी साचल्याने पेरणी वाया जाणार आहे. अगोदरच मोठ्या अडचणीतून पेरणी केली.मात्र आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या